रस्त्याचे काम तात्काळ सुरु न केल्यास निंबळक बायपास चौकात रास्तारोको करणार – डॉ दिलीप पवार.
नगर प्रतिनिधी,
निंबळक पासून MIDC ला जोडला जाणारा रस्ता हा नेहमीच रहदारीचा आहे, त्या रस्त्याने जाणाऱ्यांची संख्या देखील जास्त प्रमाणात आहे पण सध्या या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. सदरील कामासाठी निधी आलेला असून पण त्याचे काम चालू केले जात नाही या सगळ्या गोष्टीला जवळपास २ महिने उलटले आहे तरी यावर अद्याप अद्याप पर्यंत कोणत्याही ठेकेदाराची निवड झालेली नाही, वारंवार सदरील रस्त्याचा पाठपुरावा केला असता कोणीही या रस्त्याच्या दुरावस्त्याची गंभीरता घेत नाहीत.
सदरील रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु करावे म्हणून मा उपसभापती डॉ दिलीप पवार यांनी मा उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले असून त्या मध्ये सदरील गोष्टींचा उल्लेख देखील केला आहे कि या रस्त्याचे काम तात्काळ सुरु करण्यात यावे नाहीतर शनिवार दि ३ फेब्रुवारी रोजी निंबळक बायपास चौक येथे दुपारी बारा वाजता रास्ता रोको करण्यात येईल.
एम.आय.डी.सी. निंबळक रस्ता प्रचंड वाहतुकीचा असल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांची परवड होत आहे म्हणून मा उपसभापती डॉ दिलीप पवार पुढाकार घेत तात्काळ काम सुरु करण्यासाठी निवेदन दिले आहे सदरील निवेदनाची दाखल घेऊन अधिकारी काय भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष आहे