संबंध ठेव नाही तर ‘ते’ फोटो व्हायरल करेन, पुण्यात घडला धक्कादायक प्रकार, पहा सविस्तर.
पुण्यात अनेक तरुण -तरुणी शिक्षणासाठी येत असतात, कारण पुणे हे विद्येचे माहेरघर पुण्यामध्ये शिक्षण असेल. करियर असेल, भविष्य असेल या सगळ्यांसाठी हे शहर अत्यंत महत्त्वाच आहे. मात्र या पुण्यातून दिवसेंदिवस धक्कादायक प्रकार पुढे येत आहेत. पुणे या ठिकाणी अत्यंत विचित्र प्रकार घडला. ”माझ्यासोबत संबंध नाही ठेवले, तर तुझे फोटो व्हायरल करेल… अशी धमकी एका तरुणांना पिडीतेला दिली. हा आरोपी गणिताचा शिक्षक असून तक्रारदार तरुणी त्याच्याकडे शिकवणीसाठी जात होते.
दरम्यान, तक्रारदार तरुणीच्या घरच्यांनी तिचे दुसरीकडे लग्न ठरविल्याने तिने नितीश याला संबंध न ठेवण्यास सांगितले. तरीही तो तिला वारंवार भेटायचा. तक्रारदार तरुणीला तिच्यासोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी द्यायचा, तसचे तिचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करत असे, त्याचबरोबर वारंवार तरुणीचा पाठलाग करीत असल्याचाही आरोप आहे.
ज्या मुलासोबत फिर्यादी तरुणीचे लग्न जमले आहे, त्या मुलाला आरोपीने फोन करून जीवे ठार मारण्याची धमकीही दिली असल्याने त्याच्यावर सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक लोहार करीत आहेत.