अग्निपथ योजनेच्या भारती मध्ये अपयशी झाला, घरी आला आणि उचलले टोकाचे पाऊल. पहा सविस्तर बातमी.
केंद्र सरकारने अग्निपथ ही योजना या तरुणांच्या माथी मारली. त्याचे पडसाद पाहायला मिळतात. अनेक ठिकाणी अग्निपथ योजनेअंतर्गत भरती सुरू झाली आहे. आणि जेव्हा ही भरती होऊन जवान तयार होतात तेव्हा ते ”अग्निविर” म्हणून संबोधले जातात. मात्र अग्नीपथ मुळे बळी जाण्याची संख्या वाढली.
लष्करात भरती होण्यासाठी अग्नीवीर योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर या विरोधात देशभरात मोठा गदारोळ माजला होता. या सर्वामध्ये अनेकांनी यामध्ये भरती होण्यासाठी अर्ज देखील केले होते. त्यातील एका उमेदवाराने या भरती परीक्षेत अपयश आल्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. सुमित कुमार असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव असून, हा युवक उत्तराखंड येथील पौरी गढवाल जिल्ह्यातील नौगाव कमंडा गावचा रहिवासी होता.
सुमित अग्निवीर भरती मेळाव्यात सहभागी होण्यासाठी कोटद्वारला गेला होता. पुढीलवर्षी तो या योजनेत भरती होण्यासाठी पात्र ठरणार नव्हता. यंदाची परीक्षेला बसण्याची ही त्याची शेवटची संधी होती. मात्र, त्यातही तो अपयशी झाला. कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की, 24 ऑगस्ट रोजी संध्याकाळी अस्वस्थ झालेला सुमित घरी परतला होता. त्यानंतर त्याने स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले आणि कोणाशीही काही बोलला नाही.
दुसऱ्या दिवशी त्याच्या कुटुंबीयांना सुमित त्याच्या खोलीच्या छताला लटकलेल्या अवस्थेत आढळला. सुमितच्या पालकांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिल्याने त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला, अशी माहिती सातपुलीचे उपजिल्हा दंडाधिकारी संदीप कुमार यांनी सांगितले.
थोडे दिवसाची का होईना पण सरकारी नोकरी करूयात म्हणून तरुणांचा कल तिकडे वाढलेला दिसतोय म्हणून अनेक जन भरती प्रक्रियेत सहभागी होत आहेत. आणि त्यात अपयशी झालेच तर अश्या प्रकारचे पाऊल उचलत आहेत.