धक्कादायक : एकाच घरात सापडले ६ मृतदेह, पोलिसांच्या तपासात भयानक कारण समोर ! पहा सविस्तर बातमी.
अत्यंत भयावह अशी ही घटना हरियाणातील अंबाला येथील एका गावात ही घटना घडली आहे. या एकाच कुटुंबातील सहा जणांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. इथे एक सुसाईट नोट देखील आढळून आली आहे. त्या सुसाईड नोटच्या अनुषंगानं पोलिसांनी दोघा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मृत सुखविंदर सिंग यांच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर पुढील तपास सुरू केला आहे. गावातून एका घरात सहा लोक मृत अवस्थेत आढळल्यानं परिसरामध्ये एकच खळबळ माजली, यात पत्नी ,दोन मुले आई-वडील बेशुद्धावस्थेत पडले होते. सर्व लोकांना अंबाला येथील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
घटनास्थळी एक सुसाइड नोट सापडली होती, ती सुसाईड नोट पोलिसांनी जप्त केली. सुखविंदर यांनी कुटुंबातील पाच जणांचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. एका कंपनीत काम करणाऱ्या मृत सुखविंदर सुसाइट नोटमध्ये आरोप केले आहेत कंपनीच्या दोन अधिकारी यांच्याकडून दहा लाख रुपये देण्यास दबाव टाकत होते. त्यांची तो व्यवस्था करू शकत नव्हता म्हणून त्याने हे पाऊल उचल.
त्या दोन्ही अधिकार्यांची नावं सुसाईड नोटमध्ये नावे नमूद केले आहेत. आपल्या कामावरील वरिष्ठांच्या दबावामुळे यानं हे कृत्य केल. पण यामध्ये सर्व कुटुंबाला का संपवलं. ही मंडळी दहा लाख रुपये का मागत होते हे प्रश्न अनुत्तरित आहेत. सर्वांना मारून स्वतः गळफास घेण्याचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. या मृतदेहांचे शवविच्छेदन झाल्यानंतर या पाचही जणांची गळा आवळून हत्या झाली असं निष्पन्न झाला आहे तर सुखविंदर यांनी राहत्या घरी गळफास घेतला होता या प्रकरणाचा सखोल तपास पोलिस करत आहेत . एकाच कुटुंबातील सहा जणांचा असा मृत्यू होऊन तोही संशयास्पद हे अत्यंत धक्कादायक आहे.