” तुला नोकरी लावून देतो !” म्हणत प्राथमिक शिक्षकाने आपल्या प्रियसी सोबत पहा हे काय केलं.
सध्या सगळीकडे भयानक घटना घडत आहेत अनेक वेळा आपण ऐकले असेल की अनैतिक संबंध मधून हत्या होत असते. तसेच आत्महत्या देखील घडत असताना आपण पाहिले आहेत. प्रियकर व प्रियसीच्या वादातून कित्येक वेळेस खून देखील झाले आहेत आणि यातच आता अहमदनगर जिल्ह्यातून एक घटना समोर येत आहे.
अहमदनगर जिल्ह्यामधील अकोले तालुक्यात अशीच एक घटना घडली आहे. बेपत्ता असलेल्या मुलीचा प्रियकरानेच घातपात केल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेमधील जो आरोपी आहे तो प्राथमिक शाळेतील शिक्षक आहे या शिक्षकाने एका मुलीला फूस लावून पळून नेलं होतं व त्याच्या साथीदारांच्या मदतीने या मुलीचा खून केला.
यानंतर ही मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद राजूर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली या मुलीला वासळी येथील दत्तू डगळे याने व त्याच्यासोबत असलेल्या साथीदाराने शहापूर तालुक्यातील साकुर्ली परिसरामध्ये असलेल्या दगडाच्या खाणीमध्ये मारून फेकून दिले होते हे पोलीस तपासामध्ये स्पष्ट झाली.
” तुला नोकरी लावून देतो ” असे म्हणून गाडीत बसून मुलीला आरोपींनी नेलं होतं यानंतर मुलीची तक्रार राजूर पोलीस स्टेशनला देण्यात आली होती. पोलीस स्टेशन ने तांत्रिक तपास करून नाशिक येथून एका आरोपीला अटक केलं यानंतर प्रमुख आरोपींच्या मस्के आवडल्या गेल्या या प्रकरणांमध्ये पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींना ताब्यात घेतला आहे या अशा घडलेल्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे