फुरसुंगी येथील घटना; ५ मुलीना फूस लावून पळवून नेले आणि ….., पहा काय आहे प्रकरण सविस्तर.
मोठ्या शहरांमध्ये राहण्याची सोय होत नसेल, तर अनेकदा निवारागृहांचा आधार घ्यावा लागतो. ज्यांची परिस्थिती ही मोठमोठ्या हॉटेलमध्ये राहण्याची नसेल किंवा खोल्या घेऊन राहण्याची परिस्थिती नसेल अशावेळी निवारागृहांचा आधार घ्यावा लागतो. मात्र जर निवारागृहातूनच काही चुकीचं घडत असेल किंवा तिथे सुरक्षित नसेल तर मग याची जबाबदारी कोणाकडे असा सवाल उपस्थित राहतो?
कारण फुरसुंगी निवारागृहात अत्यंत धक्कादायक प्रकार घडला. मातोश्री निवारागृहातून पाच मुलींना फुस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. त्यांना नेमकं कोणत्या कारणासाठी पळून नेला आहे. याचा तपासून सुरू आहे मात्र हे प्रकरण काय घडलं पाहुयात सविस्तर…
फुरसुंगी येथील खुला निवारागृहातून पाच मुलींना फुस लावून पळून नेलं आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात अधीक्षक कौन्सिलर मातोश्री रेवमा मुलीचे खुले वस्तीगृह यांनी फिर्यादी दिली. यामध्ये अज्ञानाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी ह्या खुले निवारगृहात अधीक्षक कौन्सिल म्हणून काम पाहतात. या निवारागृहातून येथून पाच मुलींना कोणीतरी अज्ञातानी कायदेशीर रखवालीतून फूस लावून पळवून नेल आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुशील डमरे हे करत आहेत..
पुण्यातील महत्त्वाचा असणारा परिसर म्हणजेच फुरसुंगी या ठिकाणच्या या निवारागृहातून या पद्धतीने पाच मुली कोणीतरी पळवून नेणं हे अत्यंत चुकीचा आहे. याचा सखोल तपास करणं महत्त्वाच आहे. या मुलींना कुठल्या कारणासाठी नेले त्यांच्या जीविताला धोका तर नाही ना या सगळ्या गोष्टी तपासणं अत्यंत महत्त्वाचा आहे.