एका लग्नाची गोष्ट ! अक्षता पडताच भर मांडवातून पळाला नवरा, कसा नवरीने केला त्याचा पाठलाग पाहा व्हिडिओ.
एका ठिकाणी अजब असा प्रकार घडला आहे, लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यातला अत्यंत सुवर्णक्षण असतो. अनेक नातलग, मित्र मंडळी यांच्या साक्षीनं हा विवाह होत असतो. लग्न ही व्यक्तींचेच हे मिलन नसतं तर दोन कुटुंबांचेही मिलन असतं. लग्नामुळे माणसाच्या आयुष्यात एक वेगळच वळण येत असतात. भारतीय संस्कृतीमध्ये लग्नाला विशेष महत्त्व आहे. लग्नाला भारतीय संस्कृतीत संस्कार म्हटलं जातं, पण लग्न हे प्रत्येकासाठी सुखदायी असतं असं काही नाहीये कारण तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल.
भर मंडपातून एक तरुण पळत सुटला होता, नवरी मुलगी अक्षरशः वेड्यासारखी त्याच्या पाठीमागे पळत होती. पाहुणे मंडळी आणि पोलीस देखील या नवरदेवाची धरपकड करण्यासाठी त्याच्या मागे पळत होते. हा प्रकार सोशल मीडिया वरती चांगला व्हायरल होतोय. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मीम्स आणि त्यांना ट्रोल केलं जातंय.
नेमके हे प्रकरण काय आहे, तर बिहारमधील नवादा या जिल्ह्यात राहणाऱ्या गुड्डी यांचं लग्न संदीप यांच्या सोबत ठरलं होतं. गेल्या अनेक महिन्यांपासून दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू होतं. लपून-छपून गाठीभेटी होत्या. एके दिवशी गावकऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडल. मग काय कुटुंबीयांच्या समतीने लग्न करण्याचा ठरवलं, कोर्ट मॅरेज होणार होतं ठरल्या दिवशी दोन्हीही कुटुंब नवादा येथील सिविल कोर्टात हजर होते. पण लग्नापूर्वी नवरा हा पळून गेला.
आणि त्यामागे ती नवरी देखील सुटली पळणाऱ्या नवऱ्याला पोलिसांनी पकडला आणि त्यानंतर कोर्टात उभं केलं, जबरदस्तीने लग्न लावून दिल शिवाय जर त्या मुलीला त्यांने त्रास दिला तर त्याला कठोर शिक्षा होईल असा धमकी वजा इशारा दिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हिडियो व्हायरल होतोय. नेटकरी या व्हिडिओ वरती अनेक प्रतिक्रिया देत आहेत.