व्हायरल व्हिडिओ : दारूच्या नशेत तो पाचव्या मजल्याहून कोसळला अन्…., पहा सविस्तर व्हिडिओत.
कधी कोण काय करेल याचा काही नियम नाही, एका पन्नास वर्षीय दारू पिणाऱ्या व्यक्तीने धक्कादायक कृत्य केले. दारूच्या नशेत त्यांने खिडकीतून उतरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तो पाचव्या मजल्यावरनं खाली कोसळला . हा थरारक व्हिडिओ समोर आला आणि सोशल मीडियावरती व्हायरल होतोय.
सोसायटीच्या पाचव्या मजल्यावरनं खिडकीतून उतरण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याचा तोल जाऊन तो जमिनीवरती कोसळला. या घटनेत व्यक्तीचा मृत्यू झाला. निगडी परिसरात प्रेरणा सोसायटी मध्ये हा धक्कादायक प्रकार घडला.
मिळालेल्या माहितीनुसार अनिल कांबळे या व्यक्तीने घराच्या खिडकीमधून एक कापड बाहेर टाकलं या कापडाच्या सहाय्याने तो खाली उतरण्याचा प्रयत्न करत होता. पाचवा मजल्यावरनं खाली उतरत होता काही वेळ प्रयत्न केल्यानंतर त्याचा तोल जाऊन तो पाचवा मजल्यावरून खाली कोसळला. यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दारूच्या नशेत असताना माणसाला कुठल्याही गोष्टींचा काहीही भान राहत नाही. दारूचे व्यसन हे माणसाला मृत्यूच्या दारात घेऊन जातं हे या घटनेतून दिसून आलं. या सोसायटीच्या पाचव्या माजल्याहून हा व्यक्ती बाहेर पडत असताना बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. लोक त्याला असं न करण्याचा सल्ला देत होते, आरडाओरडा करत होते. मात्र हा व्यक्ती कुणाचेही ऐकायला तयार नव्हता , या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही मध्ये विचलित करणारे आहेत. दारूच्या नशेत या व्यक्तीने मृत्यूलाच कवटाळले आहे असे आपणास दिसते.