संतापजनक : निष्पाप कुत्र्याला गाडीला बांधून तब्बल ” इतक्या ” अंतरावर नेले फरफटत, डॉक्टरच्या क्रूरतेचा कळस.
सोशल मीडिया वरती अनेक धक्कादायक बातम्या समोर येत असतात. अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही बातमी पाहून तुम्हाला ही संताप येईल कारण एखादा माणूस मुक्या प्राण्यांसोबत इतकं वाईट वागू शकतो ? म्हटलं जातं की दारात उभे असणाऱ्या कुत्र्याला तुकडा टाका कारण कुत्र्यासारखा प्रामाणिक प्राणी कुठलाही नाही. जो रखवाली ही करतो आणि प्रामाणिक ही राहतो. मुक्या प्राण्यांना जीव लावला की ते माणसाला दुपटीने जीव लावतात.
अनेकांच्या घरांमध्ये पाळीव प्राणी असतात. अनेक जण त्यांना जपत असतात, जीव लावत असतात, त्यांच्यासोबत आपलं एक वेगळंच नातं असतं, आपल्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून या प्राण्यांचा सांभाळ केला जातो मात्र काही माणसं अगदी निर्दयी असतात. त्याच्याच प्रत्यय या सदरील व्हिडिओ मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कोणी एखाद्या मुक्या प्राण्यांसोबत अत्यंत वाईट पणे वागतात का? या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता एका कुत्रा रस्त्यावर धावताना दिसत आहे, त्याच्या गळ्यामध्ये दोरी बांधलेली आहे. खरं तर हा व्हिडिओ मधील कुत्रा धावत नाही, तर त्याला फरफटत घेऊन जात आहेत.
कुत्र्याच्या गळ्यातली दोरी बांधण्यात आली आहे. ती गाडीत बसलेल्या व्यक्तीने पकडलेली आहे, तो गाडीत बसलेला व्यक्ती त्या कुत्र्याला दोरीच्या साह्याने खेचत आहे. त्या ठिकाणाहून एक दुचाकीवर एक व्यक्ती जात आहे. त्यांनी ही पूर्ण घटना कॅमेरात कैद केली व त्या गाडीवाल्याला चांगलेच खडे बोल सुनावले. एका जिवंत प्राण्यांसोबत इतक्या वाईटपणाने वागणं हे माणुसकीला काळीमा फासणार आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक जण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
या व्यक्तीला आगिमध्ये जिवंत ढकलून द्या म्हणजे याला यातना काय असतील ते कळेल. प्राण्यांना बोलता येत नाही मात्र त्यांनाही भावभावना असू शकतात, त्यांनाही त्रास होऊ शकतो ही जाणीव असणं फार महत्त्वाचा आहे. डॉक्टर रजनीश गालवा यांच्या घरात कुत्रा घुसला त्यांनी कुत्र्याला प्लास्टिकच्या दोरीने बांधले आणि त्याला कारमधून पाच किलोमीटरपर्यंत ओढत नेले. दरम्यान, डॉक्टर यांच्या कारच्या मागून येणाऱ्या दुचाकीस्वारांनी कार थांबवून भटक्या कुत्र्याला रुग्णवाहिकेतून पशुवैद्यकीय रुग्णालयात नेले. तेथे रक्तस्त्राव झालेल्या कुत्र्यावर उपचार करण्यात आले.
या तरुणांनी मनेका गांधी यांना दिल्लीत या प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर मनेका गांधी यांनी शास्त्रीनगर पोलीस स्टेशनच्या स्टेशन ऑफिसरला फोन केल्यानंतर डॉ. गालवा यांच्याविरुद्ध प्राणी क्रूरतेअंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली.. डॉ. रजनीश गालवा हे एसएन मेडिकल कॉलेजमध्ये ते प्लास्टिक सर्जन आहेत.