प्रेरणादायी : ऊसतोड कामगाराची एक मुलगी बनली इंजिनियर ; दोन मुली बनणार एमबीबीएस.
मुलींना शिकून काय करायचं मुलगी ही परक्याच धन असतं अशी भावना समाज मनात आज देखील आहे. मात्र ही बातमी त्याच भावनेला तडा देणारी आहे. आपल्या दोन्ही मुलींना शिकवनारा हा पिता कुणी श्रीमंत बाप्या नाहीये तर हा ऊसतोड कामगार आहे. आपल्या दोन्ही लेकींना शिकवलं आणि त्या दोन्हीही लेकीने आपल्या बापाचं नाव चर्चेत आणले पाहूया त्यांची ही यशोगाथा.
साहेबराव भुरके असं या ऊसतोड कामगाराचे नाव. साहेबराव व त्यांच्या सौभाग्यवती ६ – ६ महिने घरापासून दूर ऊसतोडणीसाठी जातात. मात्र, हातावर पोट असणाऱ्या या अवलियाने आपल्या मुलींना चांगलं शिक्षण देण्याचं ठरवलं. यासाठी स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन पैशांची साठवणूक करत मुलींना उच्च शिक्षणासाठी पैसे पाठवलेत. मुलींनी देखील बापाच्या आणि आईच्या कष्टाची जाण ठेवली.
सध्या या कुटुंबाची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे. खरं पाहता, साहेबराव हे अशिक्षित असून अगदी तरुण वयापासून ऊसतोड कामगार आहेत, त्यांच्या पत्नी देखील त्यांच्या जोडीला ऊस तोडीचे काम करतात. त्यांना एकूण तीन मुली आणि एक मुलगा आहे. ते अशिक्षित असल्याने आणि हातावर पोट असलेल्या लोकांना किती कष्ट घ्यावे लागतात याची जाण असल्याने त्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण द्यायचे हे ठरवले आणि वेळ प्रसंगी पोटाला चिमटा देत त्यांच्या शिक्षणाचा खर्च केला आहे.
आता, साहेबराव यांनी केलेल्या कष्टाला फळ आल आहे. त्यांची मुलगी राणी साहेबराव भुरके हिने नांदेड येथून एमजीएम महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असून आता ती अभियंता ( Engineer ) बनली आहे. दुसरी मुलगी मोनिका 2020 21 मध्ये नांदेड येथील एमबीबीएस ( MBBS ) कॉलेजसाठी पात्र ठरली असून मेडिकलचे शिक्षण घेत आहे. तिसरी मुलगी सोनम लातूर येथील एमबीबीएस ( MBBS ) कॉलेज साठी पात्र ठरली आहे.