महिलांच्या कपड्याबाबतचा रामदेवबाबाचा ” तो ” व्हिडिओ आला समोर; पहा व्हायरल व्हिडिओ.
पुरे झाल आता स्त्रियांबद्दल बेताल बोलणं, कधी भिडे गुरुजी, कधी रामदेव बाबा ,तर कधी सुळे देखील महिलांबद्दल आपल्या बुद्धीतून अपुरे सल्ले देन, त्यांची माप काढणं हे बंद करा. व्यासपीठावरती उपमुख्यमंत्री यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस उपस्थित असतानाच रामदेव बाबा असं काही बोलत होते आणि तेव्हा अमृता फडणवीस गालामध्ये खुदु खुदु हसत होत्या. तमाम स्त्री मन या वक्तव्यामुळे दुखावल गेल, रामदेव बाबा हे सगळं काही सांगत असताना अगदी लहान मुलांचाही दाखला देत होते, लहान मुलं जशी बिना कपड्याची फीरतात , त्याच पद्धतीने महिलांनी देखील तसंच फिरावं का?
नेमका रामदेव बाबा काय म्हणाले पहा व्हिडियो मध्ये,
मिसेस उपमुख्यमंत्री यांचं कौतुक करत असताना रामदेव बाबांचे जीभ घसरली, अमृता फडणवीस यांच्या बद्दल रामदेव बाबा भरभरून बोलत होते, त्या म्हाताऱ्या होणार नाही त्यांचं खाण्यापिण्याचे नियोजन आहे असं बरंच काही काही आणि हेच बोलत असताना रामदेव बाबा हे सुद्धा म्हणाले की …महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात… आणि काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात. असे वादग्रस्त वक्तव्य बाबा रामदेव यांनी केले.अमृता फडणवीस यांना तरुण राहण्याची प्रबळ इच्छाशक्ती आहे, की त्या शंभर वर्षापर्यंत म्हाताऱ्या होणार नाहीत, असं योगगुरु रामदेव बाबा म्हणाले. त्या नेहमीच तोलून मापून खातात, खुश राहतात, जेव्हा पाहावं तेव्हा लहान मुलांप्रमाणे हसत असतात, साडीमध्ये महिला चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात, माझ्या नजरेने पाहिलं, तर काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असं वक्तव्य बाबा रामदेव यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मागच्या काही दिवसांपासून राज्यात महिलासंदर्भातील वादग्रस्त वक्तव्य करण्यात आली यामुळे राजकीय गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. अशातच आता योगगुरु रामदेव बाबा यांनीदेखील आता महिलांच्या कपड्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. रामदेव बाबा यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.आता याबदल अनेक प्रतिक्रिया येत आहेत.पतंजलीच्या महिला महासंमेलनाला योगगुरू रामदेवबाबांनी वादग्रस्त वक्तव्य केले. महिला साडी-सलवारमध्ये छान दिसतात, काही घातले नाही तरी छान दिसतात, असं रामदेव बाबा म्हणाले. रामदेव बाबांच्या या वक्तव्याने नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.
मुख्य म्हणजे यावेळी अमृता फडणवीस यांच्यासमोरच रामदेव बाबांनी हे वक्तव्य केले. तर या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदेंही उपस्थित होते.