प्रेरणादायी : 500 रुपये उसने घेऊन राहत गाव सोडलं, आज आहे 4 कंपन्यांची मालकीण पहा सविस्तर.
आपल्याकडे असं बोललं जातं की, माणसाच्या मनात काहीतरी करण्याची जिद्द ध्यास व आत्मसमर्पण जर असेल तर त्या माणसाला यशाच्या शिखरापर्यंत जाण्यास कोणीही रोखू शकत नाही. ती व्यक्ती जीवनातील निर्माण होणाऱ्या सर्व अडचणींना तोंड देऊन पुढे जात असते व जीवनात यश मिळवत असते. अशीच काहीशी कहाणी आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत. ही बातमी एका महिलेची असून सर्व आव्हानांना तोंड देत तिने अवघ्या पाचशे रुपयांपासून एक व्यवसाय सुरू केला आणि या व्यवसायामध्ये यश मिळवत आज ती करोडो रुपयांची मालकीण आहे. तर तिच्याबद्दल जाणून घेऊयात,
आपण ज्या महिलेबद्दल बोलणार आहोत ती महिला उत्तर प्रदेश मधील बुलंद शहर येथील एका छोट्याशा गावामध्ये राहणारी कृष्णा यादव ही आहे. हिने पाचशे रुपयांपासून ते आज चार कंपन्यांची मालकीण इथपर्यंतचा खडतड प्रवास पूर्ण केलाय. कृष्णा यादव जी चार कंपन्यांची मालकीण असून या कंपन्यांची उलाढाल करोडो मध्ये होते. छोट्या शहरांमधील असून देखील यश संपादन करून इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे. लग्नानंतर आयुष्यात सर्व काही सुरळीत चालले होते त्यातच पतीच्या ढासळत्या प्रकृतीमुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी या महिलेचे खांद्यावर आली. उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे परिस्थिती बिकट होत चालली होती, परिस्थिती इतकी हालाखीची झाली की तिला आपले राहते घरही विकाव लागले. एवढेच नाही तर तीन लहान मुले व सतत बिघडत चाललेली पतीची तब्येत, कर्ज अशा विविध प्रकारच्या समस्या तिच्यासमोर येऊ लागल्या होत्या.
पण एवढं सगळं होत असतानाही आयुष्यातील या सर्व समस्यांना ती अजिबातही घाबरली नाही. पुढे जात कामाच्या निमित्ताने दिल्लीला येण्याचं ठरवलं. तिच्यावर आर्थिक संकट एवढी वाढली होती की, तिला दिल्लीत येण्यासाठी पाचशे रुपयांची कर्ज घ्यावी लागली. कर्ज घेऊनही तिने निवडलेला मार्ग सोपा नव्हता दिल्लीमध्ये जाऊनही तिला अनेकदा निराशाच मिळाली पण तिने हिम्मत सोडली नाही.
कृष्णा व तिचे पती हे शेतकरी कुटुंबातील होते आणि त्यामुळे उदरनिर्वासाठी भाजीपाला विकायला सुरुवात केली. यासाठी तिने भाड्याने जमीन घेऊन भाजीपाला पिकवायला सुरुवात केली आणि तोच भाजीपाला घेऊन तो बाजारात विकला. या प्रकारे तिच्या उदरनिर्वाहासाठी काही पैसे मिळू लागले. यानंतर 2001 मध्ये कृषी विज्ञान केंद्रातून तीन महिन्यांचे अन्नप्रक्रिया प्रशिक्षण घेतले. फूड प्रोसेसिंगच्या प्रशिक्षणा दरम्यान लोणची बनवण्याच्या दोन वेगवेगळ्या पद्धती ती शिकली. यानंतर कृष्णा हिने लोणची बनवून ते विकण्याचा निर्णय घेतला आणि ३००० रुपये किमती लोणचे किमतीचे लोणचे बनवले ज्याची विक्री करून त्यांना ५२०० रुपये मिळाले. जरी ही रक्कम फारशी नसली तरी कृष्णाच्या आर्थिक टप्प्यातून जाणाऱ्यांसाठी ही चांगली कमाई होती.
लोणचे बनवून त्याची विक्री करण्याची पद्धत कृष्णाच्या लक्षात येताच तिने बाजारात लोणच्याला मोठी मागणी आहे म्हणून लोणच्याचा व्यवसाय सुरू केला. व त्यातून चांगले उत्पन्नही मिळू लागले. यामध्ये तिने लोणची बनवायला सुरुवात केली आणि मार्केटिंग साठी तिचे पती घरोघरी लोणची विकू लागले. हे काम अवघड असले तरी लोक आधी मोकळे लोणचे विकत घेण्यास कचरत होते, पण दर्जेदार असल्याने लोकांना आत्मविश्वास वाढला व तिचे लोणची विकली जाऊ लागली. हळूहळू तिची व तिच्या पतीची मेहनत फळास आली. लोणच्याच्या मोठमोठ्या ऑर्डर मिळू लागल्या. आणि यातच तिने स्वतःची “श्रीकृष्ण पिकल्स” नावाची स्वतःची कंपनी उभी केली. यामध्ये तिला तिच्या पतीची साथ मिळाली होती. कृष्णा लोणच्या सह इतर गोष्टींची ही विक्री करू लागली. आज ही कृष्णा चार कंपन्यांची मालकीण असून चार कोटींहून अधिकची उलाढाल होते.