प्रेरणादायी : नेत्रहीन असूनही त्याने केली नेत्रदीपक कामगिरी, खारेकर्जुने मधील नितीनचा असा आहे प्रवास.
नगर तालुक्यातील खारे कर्जुने या गावातील नितीन बोरुडे यांचा जीवन प्रवास थक्क करणारा आहे. डोळे बंद करून आपण चार पावले देखील नीट चालू शकत नाहीत मात्र नितीन बोरुडे यांनी दृष्टी नसताना ही मुंबईपर्यंत आत्मविश्वासन पावलं टाकली. खेडेगावात आपले शिक्षण पूर्ण केलं,अभ्यास करून त्यांनी एनटीपीसी ही परीक्षा देऊन उतीर्ण झाले, त्यांना वेस्टर्न रेल्वे विभागात नोकरी लागली . आता ते सात लाख पकेज घेतात. जिद्दीच्या आणि बुद्धीच्या जोरावर नितीन यांनी जीवनात उत्तुंग भरारी घेतली, त्यांचा हा जीवन प्रवास भल्या भल्यांना थक्क करणाऱ्या आहे.
29 ऑगस्ट 1986 ला त्यांचा जन्म झाला, जन्मताच उजव्या डोळा दृष्टहीन होता, मात्र डाव्या डोळ्यानं हे सगळे जग पाहता येत होत. त्यामुळे त्यांचे बालपण अगदी सर्वसामान्य मुलांप्रमाणेच होत , बालपणी त्यांना क्रिकेट खेळणं खूप आवडत असे , त्यांनी सर्व रंग, सर्व माणसं, सर्व ठिकाणी डोळ्यांनी पाहिलेली आहेत , सुरुवातीच्या काळात डाव्या डोळ्याची ही दृष्टी थोडी थोडी कमी व्हायला सुरुवात झाली, त्यामुळे फळ्यावर लिहील कमी दिसत होत, इतराच्या वहीत पाहून त्यांना लिहायला लागत. एकेदिवशी डाव्या डोळ्याने साथ सोडली , नितीन यांच्या जीवनात कायमचा अंधार दाटून आला , तेव्हाच दहावीची बोर्डाची परीक्षा होती तरी देखील न खचता आलेल्या परिस्थितीवर मात करत त्यांनी ७८ टक्के मिळाले आणि पुणे अपंग बोर्डात दुसरा क्रमांक पटकावला .
पुढे महाविद्यालीन शिक्षण पूर्ण केलं , उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांना ब्रेल लिपी शिकन महत्वाच होत, त्यामुळे FY असताना बरे लिपी अवगत केली तोपर्यंत ते सर्वसामान्य प्रमाणे शिक्षण घेत होते, टेप कॅसेट रेकॉर्डिंग याचा आधार घेत अभ्यास केला, राज्यशास्त्र मधून एमए ते उत्तीर्ण झाले. या सगळ्या प्रवासात नातेवाईकांपेक्षा मित्रांचे सहकार्य जास्त मिळालं हे त्या आवर्जून सांगतात. आपल्याला चांगली नोकरी लागावी हे ध्येय त्यांनी उराशी बाळगलं होतं.त्यासाठी त्यांनी स्पर्धा परीक्षाचा अभ्यास सुरु केला, एनटीपीसी ही परीक्षा देऊन उतीर्ण झाले, त्यांना वेस्टर्न रेल्वे विभागात क्लार्क म्हणून नोकरी लागली.पुढे यात परीक्षा देत ते कार्यालय अधीक्षक झाले. आता ते सात लाख पकेज घेतात.
मुंबई मध्ये नोकरी कर सोप नाही ,मुंबईत सर्व सामान्य माणसाला देखील सुरुवातीचा काळ हा खूप संघर्षाचा असतो. लोकलचा प्रवास असेल तिथला राहणीमान असेल, तिथल्या रोजच्या दैनंदिन गोष्टी असतील यांच्यासोबत जुळवून घेऊन घेताना त्रास झाला.सुरुवातीच्या काळात त्यांच्या सोबत गावातील मित्र त्यांच्याकडे आठ आठ दिवस सोबत म्हणून राहत होते. ट्रेन मध्ये बसून दयाला आई रोज येते सकाळी मुंगीला पाय ठेवायला जागा नसते म्हणून मोठा त्रास होतो. त्यांनी आपल्या स्वतः च्या बळावर आपल्या स्वतःचा हक्काचं घर बांधल, मोकळ्या वेळेत ते आता ग्रामीण भागातील मुलांना स्पर्धा परीक्षांसाठी योग्य ते मार्गदर्शन करतात. या मुलांसाठी देखील ते प्रेरणादायी आहेत.
नेत्रहीन नितीन बोरुडे एक खंत व्यक्त करतात…
अपंग अंध यांना फक्त समाजाची सहानुभूती नको असते तर समाजाकडून त्यांना सहकार्याची देखील अपेक्षा असते, त्यांना जीवनसाथी मिळण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे,