प्रेरणादायी : वडील कोर्टात होते शिपाई, त्याच ठिकाणी आज मुलगी न्यायाधीश.
एखाद्या सिनेमात घडावं अगदी तसं प्रत्यक्षात घडले आहे. कारण आपले वडील ज्या ठिकाणी काम करतायेत त्या ठिकाणीच आपण एका उच्च पदावरती असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि त्यासाठीच ही मुलगी धडपडत होती. या धडपडीमध्ये वडिलांनी तिची साथ सोडली आणि वडील कायमचे काळाआड झाले मात्र तिने कधीही आपली जिद्द सोडली नाही आणि त्यातूनच तिने हे घवघवीत यश संपादन केलं.
जर तुम्ही परिश्रम पूर्वक आणि संपूर्ण जोमाने तयारी केली असेल, तर परीक्षा कितीही अवघड असो, तुम्हाला नक्कीच यश मिळते. बऱ्याचदा अनेक मुलांना त्यांची त्यांची वडिलोपार्जित व्यवसाय मिळतात आपल्या घरात ही पार्श्वभूमी आहे म्हणून आपण असं काहीतरी करू असं बऱ्याचदा ठरवलं जातं मात्र आपले वडील शिपाई आहेत आणि त्याच कोर्टात आपण न्यायाधीश व्हावं ही इच्छाशक्ती असणे फार महत्त्वाचे.
आणि ज्या ठिकाणी वडिलांनी आयुष्यभर काम केलं त्याच ठिकाणी त्यांची मुलगी न्यायाधीश झाली आहे. हा प्रेरणादायी प्रवास आहे अशीच बिहारमध्ये राहणाऱ्या अर्चनाची आहे. अर्चनाचे वडिल गौरीनंदन कोर्टात शिपाई होते. आता अर्चना कोर्टात जज बनली आहे. शालेय शिक्षणादरम्यान तिने वडिलांना न्यायाधीश होण्याचे वचन दिले होते. मात्र स्वप्न पूर्ण झाल्यानंतर या प्रसंगी तिचे वडील हयात नाहीत याचे तिला दुःख वाटत आहे.
वडिलांच्या जाण्याने ती खचून न जाता तिने आपला अभ्यास सुरूच ठेवला आणि तिने यश संपादन केला. आयुष्यभर वडिलांनी तिच्या शिक्षणासाठीची तयारी केली होती ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती धडपडत राहिली. अर्चनाचे वडील गौरीनंदन हे सारण जिल्ह्यातील सोनेपूर व्यवहार न्यायालयात शिपाई होते. अर्चना हिने शास्त्रीनगर शासकीय हायस्कूलमधून 12 वी व पाटणा विद्यापीठातून पुढील शिक्षण घेतले.
यानंतर तिने शास्त्री नगर शासकीय हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना संगणक शिकवणे सुरू केले. याच दरम्यान अर्चनाचे लग्न झाले. अर्चनाला लग्नानंतर वाटले होते की, आता तिचे स्वप्न पूर्ण होणार नाही. मात्र तिच्या पतीने तिला प्रोत्साहन दिले. आणि त्यामुळेच लग्नानंतर देखील ती एवढे मोठे यश मिळवू शकली यामध्ये तिच्या वडिलांचा तिच्या बहिणी यामध्ये तिच्या माहेरच्या आणि सासरच्या दोन्हीही मंडळींचे तितकाच सहकार्य लाभले. आपण पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची आशा असेल तर नक्कीच ते स्वप्न पूर्ण होतं याचे उत्तम उदाहरण म्हणजे अर्चना ज्या ठिकाणी आपले वडील शिपाई होते त्याच न्यायालयात आज अर्चना न्यायाधीश झाली आहे.