देवदर्शन घेऊन परतत असताना भक्तांवर काळाचा घाला; बाप-लेकीचा जागीच मृत्यू पहा बातमी सविस्तर.

राज्यात रोज अपघात होत आहेत . त्यात मृत्युमुखी पडणार्यांच्या संख्या वाढत आहेत . साई दर्शन करुन हैदराबादला निघाले होते त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला , यात बाप-लेक जागीच मृत्यू झाला. तर ४ जण जखमी, एकाची प्रकृती अत्यवस्थ आहेत. हा अपघात लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात असणाऱ्या वाघोली येथे झाला आहे. हैदराबादकडे निघालेल्या ब्रेझा कारला समोरून येणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिली. या अपघाताची तीव्रता एवढी होती की ब्रेझा वाहनाचा चक्काचुर झाला आहे.
शिर्डीवरुन देवदर्शनाहून परत जात असताना लातूर ते जिल्ह्यातील औसा तालुक्यातील वाघोली पाटीजवळ ही कार आली. त्याचवेळी समोरुन एक ट्रक आला आणि या दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. कोणाला काही समजायच्या आत एका क्षणात होत्याचे नव्हतं झालं.
या भीषण अपघातात सायकुमार डूबली आणि त्यांची कन्या तनविका डूबली हे दोघेही जागीच ठार झाले. तर पवित्रा, सावरिया, नविश, शाम आणि शौर्य हे जखमी झाले आहेत. हे कुटुंब हैद्राबाद येथील होतं. त्यांना लातूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. पवित्रा आणि सवरिया गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच किल्लारी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
ही घटना ताजी असताना आता शिर्डीहून साईबाबांचे दर्शन घेऊन हैद्राराबादला निघालेल्या भक्तांचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, यात बापलेकीचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले असून एकाची प्रकृती अत्यवस्थ आहे.