मोठ्या नोकरीला लाथ मारली; गावात येऊन शेती फुलवली , गावकऱ्यांनाही शिकवली प्रगत शेती व रोजगाराचा मार्ग.
भारत देशाची ओळख एक कृषीप्रधान देश आहे. मात्र, मधल्या काळात निसर्गाचा लहरीपणा आणि शेतीतून मिळणारे कमी उत्पन्न यामुळं लोकांनी शेती व्यतिरिक्त रोजगारासाठी वेगळी वाट धरली होती. पण आता शेतीमध्ये होत असलेल्या वेगवेगळ्या प्रयोगांमुळं तरुण वर्गही शेतीकडे आकर्षित होत आहे आपल्याला पाहायला मिळत आहे. देशात नवरात्रोत्सवाची धामधूम चालू असताना आम्ही अशाच एका नवदुर्गाची गोष्ट समाजासमोर मांडत आहोत. कौशांबी जिल्ह्यातील प्रितीने शेतीमध्ये उल्लेखनिय काम करुन समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे. इतकंच, नव्हे तर स्वतःसोबत तीने गावकऱ्यांचीही प्रगती साधली आहे.
प्रिती ही पूर्वी पेशाने टेक्सटाइल डिझायनर होती. मात्र, आता तीने ती नोकरी सोडून शेतीकडे वळली आहे. शेतीत घाम गाळून तिने स्वतःचा वेगळा व्यवसाय उभा केला आहे. गावकऱ्यांनाही शेतीतील प्रगत तंत्रज्ञान शिकवून त्यांनाही रोजगार वाढीसाठी मदत केली आहे. पूर्वी गावातील लोकं शेतीसोडून दुसऱ्या शहरात रोजगारासाठी जात होते. मात्र आता प्रिती यांनी त्यांना शेतीचे ज्ञान शिकवून पुन्हा शेतीकडे वळवले आहे. प्रितीने गावात भाज्यांचे पिक घेण्यास सुरुवात केली. भरघोस उत्पन्न यायला लागले.
प्रिती यांचा जन्म ग्रामीण भागात झाला आहे. मात्र, त्यांनी प्राथमिक शिक्षण प्रयागराज येथे घेतलं. त्या टेक्सटाइल डिझायनर आहेत. २००८मध्ये डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एका कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. त्याचदरम्यान त्यांचं एसपी सिंह यांच्यासह लग्न झालं. लग्नानंतर त्या पुणे आणि इंदूरमध्ये राहत होत्या. २०२०मध्ये लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर त्या त्यांच्या पतीसह पुन्हा गावी परतल्या. त्याचवेळी त्यांना गावात काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी शेतीला प्राधान्य देणे महत्वाचे समजले आणि पहिले मटार, टॉमेटोची पिकं घेतली. त्यानंतर त्यांनी पपईची शेती सुरू केली. यातून चांगले उत्पन्न मिळू लागले. त्यानंतर त्यांनी गावातील अन्य शेतकऱ्यांनाही रोजगार मिळवून देण्यासाठी योजना बनवली.
आज प्रितीसोबत गावातील सहा कुटुंब आहेत. आता हे सर्व जण दूधी, दोडका आणि कारलं या भाज्यांचे पिके घेतात. या पिकांच्या उत्पादनातून दररोज सुमारे पाच हजारांचे उत्पन्न मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याची किंमत सुमारे ७५ हजार रुपये प्रति झाली असून, महिन्याला २० हजार रुपये अतिरिक्त खर्च येतो. पिकं घेतल्यानंतर त्यांना व्यवस्थित भाव मिळणे आव्हान असते. आणि हि अडचण पाहून त्यासाठी त्यांनी प्रयागराज येथील मुंडेरा मंडईतील व्यापाऱ्यांशी संपर्क साधला. आता भाजीपाला गाडीने दररोज बाजारात पोहोचतो. सर्व काही ठरवल्याप्रमाणे होत आहे. त्यामुळे आता कोणतीही अडचण नाही. गावातील इतर शेतकरीही पिकांच्या उत्पादनाची माहिती घेत आहेत, असं प्रिती यांनी म्हटलं आहे.