अकोल्याच्या इंजीनियरिंग विद्यार्थ्यांची हत्या; संगमनेरात मृतदेह सापडला, पोलिसांचा अजूनही तपास सुरूच..
संकेत नवले हा गेल्या काही दिवसांपासून डिप्लोमा इंजिनिअरींगचे शिक्षण घेण्यासाठी संगमनेरला आला होता. घरुन ये जा करण्यापेक्षा त्याने आमृतवाहीनी कॉलेजच्या समोरच काही मित्रांच्या समवेत रुम देखील घेतली होती. शिक्षक सुरळीत सुरू असताना अचानक काल त्याचे कोणासोबत तरी वाद झाले असावेत. त्यामुळे, त्यांनी संकेत सुरेश नवले याच्या डोक्यात काहीतरी तिक्ष हत्याराने वार केले. त्यात तो जखमी झाला आणि नंतर तो मयत देखील झाला. मात्र, याच्या मृतदेहाची विल्हेवाट कोठे व कशी लावायची? म्हणून आरोपींनी संगमनेर शहराच्या लगत अडगळीच्या ठिकाणी सुकेवाडी परिसरात त्याला फेकून दिले.
अकोले तालुक्यातील नवलेवाडी येथे राहणाऱ्या संकेत सुरेश नवले, या विद्यार्थ्याचा धारधार हत्याराने खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संगमनेर शहरातील सुकेवाडी परिसरात दि. ८ डिसेंबर २०२२ रोजी हा प्रकार घडला असून आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास जेव्हा हा मृतदेह स्थानिक नागरिकांना पाहिला, त्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात महिती दिली. पोलिसांनी संबंधित तरुणाची ओळख पटण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करुन सगळीकडे मृतदेहाचे फोटा व्हायरल केले. त्यानंतर, संकेत नवले याच्या मित्रांना त्याचा फोटो पाहिला असता थेट पोलीस ठाणे गाठले. नवले हा अकोले तालुक्यातील असून तो इंजिनिअरींगचे शिक्षण घेण्यासाठी संगमनेरला आला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या पालकाशी संपर्क साधला आहे. त्याचे वडिल हे शिक्षक त्यांचा कौटुंबिक वारसा देखील सुसंस्कृत आहे.
त्यामुळे, हा खून नेमकी का व कोणी केला याचे रहस्य कायम असून पोलिसांनी पुढील कायदेशिर प्रक्रिया सुरू केली आहे. तर, मुलाची हत्या का व कोणी केली याचा शोध पोलिसांनी तत्काळ लावावा अशी विनंती नातेवाईकांनी केली आहे.दरम्यान, दुसऱ्या दिवशी दि. ९ डिसेंबर २०२२ रोजी सुकेवाडी परीसरातून काही लोक सकाळी शहराकडे येत होते. तेव्हा त्यांना संबंधित तरुणाचा मृतदेह दिसून आला. त्यांनी तत्काळ शहर पोलीस ठाण्यातील काही पोलीस कर्मचारी यांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन घटनेची शाहनिशा केली असता तेथे संबंधित तरुण मिळून आला. मात्र, हा नेमकी कोण असावा? याबाबत पोलीस देखील संभ्रमात होते. त्यामुळे, त्यांनी प्रथमतः अकस्मात मृत्युची नोंद केली. मात्र, तरूणाच्या डोक्यावर कोणत्यातरी हत्याराने वार झालेले होते. त्यामुळे, त्याची ओळख पटणे महत्वाचे होते. म्हणून पोलिसांनी तरुणाच्या वर्णणाचा एक फोटोसह मेसेज तयार केला आणि तो व्हाटसऍप, फेसबुक अशा अन्य ठिकाणी पब्लिश केला.
दरम्यान, दोन तासानंतर प्रत्येक गृपवर हा मेसेज फिरल्याने तो इंजिनिअरींगचे शिकणाऱ्या मुलांच्या गृपवर गेला. त्यानंतर या तरुणाच्या मित्रांनी पोलिसांशी संपर्क केला आणि हा तरुण संकेत सुरेश नवले येथील असून तो अमृतवाहीनी कॉलेजच्या समोर राहतो अशी माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याची रुम शोधली, त्याचे मित्र कोण आहेत याची चौकशी केली. त्यानंतर काही संशयीत गोष्टी पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. नवले हा काल मित्रांसोबत हॉटेलमध्ये गेला होता. त्यानंतर तो रुमवर गेला नाही. त्याचे मोबाईल रेकॉर्ड आणि अन्य काही गोष्टींचा पोलीस बारकाईने तपास करीत आहेत. नवले हा व्यसकी किंवा अन्य कोणताही नादिक नव्हता. त्यामुळे, त्याच्या खुनाचे गुढ वाढले आहे.