चार दिवसापूर्वी मोठ्या थाटामाटात केलं लग्न; लग्न होताच लाखों रुपयांचे दागिने घेऊन पळाली नवरी; उंबरे येथील घटना.
भरपाईसाठी दलालाच्या घरी वरपक्षाचा तगादा, दागिन्या सह पैसे न मिळाल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा.
राहुरी प्रतिनिधी – राहुरी तालुक्यातील उंबरे येथील गेल्या चार दिवसापूर्वी मोठ्या थाटामाटात शुभ विवाह झालेल्या नववधूणे विवाहाच्या दुसऱ्या दिवशी देवदर्शन आटपल्यानंतर सायंकाळी अंगावरील लाखो रुपयांच्या सोन्याच्या दागिन्या सह
कोबरा केल्याने नवरदेवास वर पक्षांची भंबेरी उडाल्याने परिसरात एकच खळबळ असरली आहे.
उंबरे तालुका राहुरी येथील एका दलालाने सुमारे लाख रुपये कमिशन घेऊन गावातीलच एका तरुण युवकाचा शुभविवाह औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील एका नवविवाहिती बरोबर हिंदू संस्कृती प्रमाणे लावून दिला लग्न समारंभामध्ये या वधूला सुमारे लाखभर रुपयाची वेगवेगळे दागिने घालण्यात आले सर्व वऱ्हाडी मंडळींना मिस्टरांना भोजन देण्यात आले.
रिती रिवाजा प्रमाणे सर्व धार्मिक कार्य पार पडल्यानंतर नववधू सायंकाळी वरा बरोबर उंबरे येथे आली दुसऱ्या दिवशी दोघांनी जोडीने देव दर्शन घेऊन घरी आले. याच दिवशी सायंकाळी नव वधू अंगावरील सोन्याच्या दागिन्यासह फरार झाल्याने नवरदेवासह त्यांच्या घरच्यांनी तिचा परिसरात शोध घेतला परंतु नववधू सापडली नाही. त्यामुळे वरपक्षांनी थेट दलालाचे घर गाठले दलाला हकीगत सांगितल्यानंतर दलालाने वधूच्या नातेवाईकांना फोन लावला तेव्हा नातेवाईकानी सांगितले की नववधू
तिच्या घरी सुखरूप आहे.
त्यामुळे आपली फसवणूक झाली असल्याची बाब नवरदेवासह नवरदेवाकडील मंडळींच्या लक्षात आली आता शुभविवाह जुळून आणणाऱ्या दलालाकडे कमिशन म्हणून दिलेले एक लाख रुपये तसेच वधूला घातलेले सोन्याचे दागिने परत मिळावे अशी मागणी वर पित्याकडून होत असून पैसे व दागिने न मिळाल्यास पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे अशी घटना गावामध्ये पहिल्यांदाच घडल्याने घटनेची परिसरात जोरदार चर्चा झडत आहे.
प्रतिनिधी जालिंदर ढोकणे, राहुरी.