फडणवीस गृहमंत्री असून देखील पुण्यात कोयता गँग सक्रिय; गुन्हेगारांना नेमके अभय कोणाचे ?
पुण्याला विद्यचे माहेरघर म्हटलं जातं, पुण्यामध्ये संपूर्ण देशातून विद्यार्थी शिकण्यासाठी येतात. मात्र यापुढे दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे. या ठिकाणी शिकणारे विद्यार्थी विद्यार्थिनी सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित राहतो , कारण गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी कोयता गॅंग ही कार्यरत आहेत . या कोयता यामुळे या ठिकाणी प्रचंड प्रमाणात दहशत माजवली जाते,
यातून अनेक गुन्हे देखील घडले आहेत यामुळे इथे पुण्याचा आणि आता गुन्हे गुन्हेगारीचं नातं हे कुठेतरी वाढू लागले, त्यामुळे पुण्यामध्ये या अशा पद्धतीच्या गॅंगमुळे पुण्याचे नावही खराब व्हायला लागलेशहराच्या वेगवेगळ्या भागात कोयते उगारुन दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारांच्या विरुद्ध पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला.
गेल्या महिनाभरापासून कोयता गँगचे गुन्हे काहीसे कमी झाले असताना पर्वती गाव परिसरात कोयता गँगने पुन्हा दहशत माजविली. आरोपींनी एका तरुणावर कोयत्याने वार केल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी नवनाथ वाडकर आणि शेखर वाघमारे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आयुष चव्हाण असे जखमी झालेल्याचे नाव आहे. आयुष, त्याचे मित्र अश्विन रेणुसे, मुसा पटेल दुचाकीवरुन पर्वती पायथा परिसरातून निघाले होते.
आरोपी नवनाथची अश्विन रेणुसे याच्याशी काही दिवसांपूर्वी भांडणे झाली होती.आरोपी नवनाथ, शेखर यांनी दुचाकीवरुन निघालेले आयुष, अश्विन, मुसा यांना अडवले. आयुष याच्यावर कोयत्याने वार करुन आरोपी पसार झाले. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात आयुष गंभीर जखमी झाला. पसार झालेल्या दोघा आरोपींना पोलिसांनी पकडले. पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले तपास करत आहेत.