दत्तक घेतलेल्या सात वर्षीय चिमुकलीवर अमानुष अत्याचार; इस्त्रीचे चटके, हात मोडला अन् गुप्तांगात…
अत्यंत विचित्र घटना घडली आहे , एका महिलेने दत्तक मुली बरोबर अत्यंत चुकीच केल, हि बातमी वाचून तुम्हाला संताप येईल कारण एका महिलेने मुली सोबत चुकीच केल आहे,काही वर्षापूर्वी आरोपी महिलेने एका मुलीला दत्तक घेतलं होतं. ही महिला मुलीकडून घरातील काम करून घेत असतं. कामात काही चूक झाली, तर तिच्यावर अत्याचार करत असत.
जखमी अवस्थेत मुलीला रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हा महिलेने खेळताना तिचा हात मोडल्याचं डॉक्टरांना सांगितलं. पण, मुलीची परिस्थिती पाहून डॉक्टरांनी तपासणी केली असताना धक्कादायक खुलासे झाले.डॉक्टांरानी मुलीच्या शरीरावर चटके दिल्याचे व्रण आढळून आले. तसेच, मुलीच्या गुप्तांगात डॉक्टरांना लाकूड आढळून आलं. त्यानंतर डॉक्टरांनी याची माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी चौकशी केली असता, ही मुलगी कानपूरची राहणारी असल्याची माहिती समोर आली. तिच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला आहे. मग, आरोपी महिलेने तिला दत्तक घेतलं होतं. ही मुलगी धूमनगंज पोलीस ठाण्याच्या परिसरात असलेल्या प्रीतम नगर येथे ४ महिन्यांपासून या महिलेबरोबर राहत होती.
याबाबत पोलीस ठाण्याचे अधिकारी राजेश कुमार मौर्य यांनी सांगितलं की, “आरोपी महिला अंजना सिन्हा आणि पती अरूण कुमार सिन्हा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मुलीची परिस्थिती गंभीर असून तिच्यावर उपचार करण्यात येत आहे, दत्तक घेऊन अस वागण अत्यंत चुकीच आहे याने समाजात चुकीचा संदेश पसरतो