Viral Video : स्टंट करायला गेला आणि त्याच्यासोबत असे काही घडले कि तुमचा विश्वास बसणार नाही.
आज काल इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याची क्रेझ लोकांमध्ये वाढत चालली आहे. लोक मजेशीर धोकादायक स्टंट करताना सुद्धा दिसून येतात. सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडिओही आपण पाहिले असतील. असच एक स्टंट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि तो पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरणार नाही.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की एक व्यक्ती गाडी चालवत असताना कशा पद्धतीने स्टंट करत आहे. एक तर तो तिचे पुढचे चाक उचलतो तर कधी कधी दोन्ही हात सोडून दुचाकी चालवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर अचानकपणे चालत्या बाईक वरून उतरतो आणि जमिनीवर पळण्याचा प्रयत्न करतो मात्र असं करत असताना त्याचा अचानक तोल बिघडतो आणि तो भयानक प्रकारे गाडी सहित रस्त्यावर पडतो हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
हा व्हिडिओ @HasnaZarooriHai नावाच्या ट्विटरवर आयडीवर शेअर करण्यात आला आहे आणि ‘किस किस को ये स्टंट करना है?’ असे कॅप्शनमध्ये मजेशीरपणे लिहिले आहे. फक्त पंधरा सेकंदाचा हा व्हिडिओ आहे पण आतापर्यंत जवळजवळ 42 हजाराहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाईक देखील केले आहे. त्याचप्रमाणे या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देखील आल्या आहेत.
तसं पाहिलं तर स्टँड हे लहान मुलांचा खेळ नाही यामध्ये खूप मोठा धोका सुद्धा असतो म्हणूनच सर्व व्यावसायिक लोक जे स्टंट करण्याचा प्रयत्न करतात ते खूप काळजी देखील घेत असतात त्याचप्रमाणे सुरक्षिततेचा पूर्ण वापर करत असतात. जेणेकरून कोणत्याही प्रकारचे दुर्घटना करू नये आणि जरी दुर्घटना घडली तर त्यांना त्यापासून कसल्याही प्रकारची इजा होणार नाही याची योग्यती काळजी घेतात पण बऱ्याच वेळेस अनेकजण या गोष्टी कोणत्याही सुरक्षिततेशिवाय आजमावत असतात हे त्यांच्यासाठी नक्कीच धोक्याची घंटा आहे.