शेती सोडून शेती उपयोगी व्यवसाय चालू केला, शेतकरी भगवान शेतकऱ्यांसाठी खरा खुरा भगवान ठरला.
शेतकरी म्हटलं की, अडचणी आल्याच शेतकऱ्याचे जगणं हे पावसावर अवलंबून असतं. आणि पाऊस हा देखील बेभरवशी असतो. उगवलेलं पिक याचं चांगलं उत्पादन मिळेल का ? या आशेवरती हा शेतकरी असतो. मात्र हे पीक उभे करण्यासाठी त्याला मोठी मशागत करावी लागते. खुरपणी, नांगरणी, पेरणी त्यानंतर पिकाच्या जतन एखादा रोग पडू नयेत यासाठी फवारणी आणि रोग पडला असता त्यातून आपल्या पीक वाचवायचं कसं अशा अनेक अडचणींवर मात करावी लागते.
करमाड संभाजीनगर येथील भगवान उकिरडे यांनी औद्योगिक वसाहतीमध्ये एग्रीकल्चर केबल तयार करण्याची ओमराज इंडस्ट्री कंपनी सुरू केली. या पुन्हा गुंडाळून ठेवण्याची सोपी पद्धत या यांचा मेकॅनिकल शिक्षण झाल्यावर संभाजी नगर मधील एका कंपनीतील प्रोडक्शन मध्ये काही वर्षे त्यांनी काम केलं. नोकरी करत असताना स्वतःचा उद्योग सुरू करण्याचा विचार केला. 2014 मध्ये नोकरी सोडून हा विचार त्यांनी कृतीत आणला. आणि चुकांमधून आपण शिकलो असते.
सुरुवातीला कार वॉशिंगसाठी वापरले जाणारे फ्लेक्झिबल पाइप तयार करण्यास सुरवात केली. त्यांनी इंदूर येथील मशिनरी मागवली आणि पाईप ठराविक मागणीमुळे काही ठिकाणी नवीन करण्याचं त्यांनी ठरवलं मागणी आणि त्यासाठी अडचणी येत होत्या व त्यांनी शेतीसाठी लागणाऱ्या पीव्हीसी पाईप हे सुरू करण्याचं ठरवलं, हंगामी कोरडवाहू शेती असल्याने अनेक शेतकऱ्यांना शेतात पाईपलाईन नाहीये त्यामुळे त्याला तात्पुरता वापर करून पिकांना पाणी देण्यासाठी केबलची आवश्यकता असते, अभ्यास करून अग्रिकल्चर केबल तयार करण्याचं निश्चित केलं त्यासाठी उल्हासनगर मधून मशनरी मागवली या माध्यमातून केबल तयार करण्यास सुरुवात झाली.
युनिटमध्ये 6SQ ते 14SQ पर्यंत केबल तयार केली त्यांच्याकडे महिन्याभरात दोन लाख मीटर केबल तयार होते. पूर्वी ती इतर ठिकाणाहून भागवावी लागत होती आता ती स्थानिक पातळीवरती वाजवी किमतीत शेतकऱ्यांना मिळत आहे. अनेक ठिकाणी लाईट साठी केबल ही वापरली जाते. केबल सोबत उत्पादन सुरू करून महिना दोन महिने वापर करून पुन्हा ती गुंडाळून ठेवता येते व त्याचा वापर करता येतो आणि त्यामुळे त्या पाईपला मराठवाड्यातून मागणी वाढली. आपल्याच शेतकरी बांधवांसाठी शेतकरी पुत्र सुरू केलेली ही कंपनी आज खूप मोठा आधार शेतकऱ्यांना वाजवी किमतीत आपल्याला हवे असणारे पाईप या ठिकाणी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे आपलं पीक जपण्याचं लवकरात लवकर काम केले जाते. नोकरी सोडून शेतकऱ्यांच्या सेवेसाठी स्वतःचा व्यवसाय करून यातून शेतकरी बांधवांची सेवा करणारा हा भगवान खरंच शेतकऱ्यांसाठी भगवान ठरला.