पतीसोबत वाद करून माहेरी गेली, परत आली तर पती अश्या अवस्थेत सापडला.
बहुतेकदा असं म्हटलं जातं की नवरा बायकोच्या भांड्यात देवानेही पडू नये. कारण की, पती-पत्नीचे वाद आहे हे क्षणिक असतात कितीही भांडण झालं तरी पुन्हा ते एकत्र येतात. पती-पत्नी या दोघांमध्ये वाद झाला. किरकोळ मात्र नंतर हा वाद शिगेला पोहोचला आणि रागाच्या भरात पत्नी गावात राहणाऱ्या आपल्या आईकडे म्हणजेच माहेरी निघून गेली.
अशी घटना जामनेर तालुक्यातील गंगापूर येथे घडलेली आहे. आपल्या पतीला सकाळी डबा बनवून देत असताना पतीसोबत तिचे वाद होतात. आणि वाद झाल्यानंतर ती तिच्या गावातच असलेल्या माहेरी तिच्या आईकडे निघून जाते. पण अर्धा तास झाल्यानंतर ती पुन्हा घरी येते. घरी आल्यानंतर तिला तिचा पती घरात दिसत नाही म्हणून ती गावामध्ये सगळीकडे त्याचा शोध घेते. शोध घेत असताना गावालगतच तिच्या पतीचा मृतदेह आढळून आला. ही घटना 24 जून रोजी घडली आहे.
या दरम्यान पतीचा कुणीतरी खून केला अशी तक्रार त्या पत्नीने जामनेर पोलीस स्टेशनला दिली आहे. त्यावरून खूणाचा गुन्हा दाखल केला आहे. श्याम फकीरा ठाकरे वय 30 असे त्या मयत झालेल्या पतीचे नाव आहे. गंगापुरी येथे श्याम फकीरा ठाकरे हे त्यांच्या पत्नी विद्या ठाकरे यांच्यासोबत राहत होते. 24 जून रोजी पत्नीने डबा बनवला यावेळी तिच्यासोबत वाद होतात व त्यांची पत्नी गावातच माहेर असल्यामुळे माहेरी आईकडे निघून जाते. आणि अर्ध्या तासाने आल्यानंतर तिला आपले पती घरात दिसत नाही ती नातेवाईकांकडे शोध घेते पण तिथेही ते आढळून येत नाही. काही तासांनी श्याम फकीरा ठाकरे यांचा मृतदेह गारखेडे गावाजवळ आढळून येतो. जामनेर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या तक्रारीनंतर संपूर्ण गावामध्ये खळबळ उडाली असून जो कोणी त्या पतीचा मारेकरी असेल त्या मारेकऱ्याला शोधण्याचे पोलिसांसमोर आता आव्हान आहे. सदरचा तपास हा सहाय्यक पोलीस निरीक्षक हे करत आहेत.