जि.प.प्रा.शाळा दत्तवाडी केंद्र सोयगाव येथे ‘मराठवाडा मुक्ती संग्राम दिन’ उत्साहाने साजरा.
विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगाव दि. 17 सप्टेंबर 2022 रोजी जि. प. प्रा. शाळा दत्तवाडी केंद्र सोयगाव येथे
‘मराठवाडा मुक्ती संग्राम दिन’ उत्साहाने साजरा करण्यात आला.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री प्रभु लांडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळेतील इयत्ता पहिलीच्या वर्गातील चिमुकल्या विद्यार्थींनी सामुहीक राष्ट्रगीत गायन करून तिरंगा झेंड्याला सलामी दिली.
सदर कार्यक्रमाचे वेळी मुख्याध्यापक बापु सुकदेव बाविस्कर , गणेश पितांबर बाविस्कर.सह शिक्षक. ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, जेष्ठ नागरिक, अंगणवाडी ताई, ग्रामस्थ, पालक, सर्व विद्यार्थी व शाळेतील शिक्षक उपस्थित होते.
सदर कार्यक्रम उत्साहाने साजरा करण्यात आला