धक्कादायक : सहावीतील विद्यार्थ्याला शिक्षकाकडून काठी आणि पाईपने बेशुद्ध होईपर्यंत मारहाण. पहा सविस्तर.

कोरोनाच्या महाभयंकर संकटानंतर अटी शर्ती शिथिल करण्यात आल्या, सर्वत्र सगळ्या बाजारपेठा, सर्व ठिकाण खुली करण्यात आले आहेत. यामध्ये शाळा देखील चालू झाल्या असून आता शाळेतील विद्यार्थी रोजच्या रोज शाळेत जातात, अभ्यास वगैरे करतात आणि त्यांचे शालेय जीवन जगत आहेत. ही बातमी शाळेच्या संदर्भातलीच आहे. गोंदिया या ठिकाणाहून ही बातमी समोर येते, यात बातमीत शारीरिक सरावादरम्यान दोन शिक्षकांनी एका सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थीला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत तो विद्यार्थी बेशुध्द पडला आहे. आदिवासी समाजातील हा मुलगा असून गोंदियातील प्रसिद्ध प्रोग्रेसिव्ह शाळते तो शिकत होता.
या प्रकरणी पालकांनी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आणि पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून प्रकरणाचा चौकशीसाठी समिती गठित करण्यात आली असून एका शिक्षकाला नीलंबित करण्यात आले, तर दुसऱ्या शिक्षकाने माफीनफा लिहून दिला आहे, पालकांनी गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केल्या नंतर पोलिसांनी तेजस तुरकर आणि लालचंद पारधी या दोन्ही शिक्षकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला .
या दोन्हीही शिक्षकांना अटक देखील करण्यात आली. मात्र या दोन शिक्षकांनी आदिवासी विद्यार्थ्याला इतक बेदमपणे मारलं की, तो विद्यार्थी यामध्ये बेशुद्ध झाला, शारीरिक सरावा दरम्यान ही मारहाण झाली, पालकांना आपला मुलगा बेशुद्ध पडल्याचं कळता क्षणी त्यांनी शाळेमध्ये धाव घेतली, मुलाला रुग्णालयात दाखल केला औषध उपचार केले व नंतर त्याच्याकडे विचारपूस केली असता शिक्षकाने त्याला मारहाण केल्याचा खुलासा झाला.
मुलानी दिलेल्या माहितीनुसार पालकांनी शिक्षकासह शाळा व्यवस्थापनच्या विरोधात कारवाई केली. त्यामुळे या प्रकरणात आता पुढे काय कारवाई होते हे पाहणं फार महत्त्वाचे आहे. मात्र आढळलेल्या प्रकारामुळे आता विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याचं कि नाही हा गंभीर प्रश्न पालक वर्गाला पडला आहे.