तिच्या शिक्षणासाठी शेती विकली; वयाच्या 19 व्या वर्षी पहा तिने काय केले. बातमी सविस्तर.
ज्या वयात आपल्या उच्च शिक्षणाची सुरुवात होते त्याच वयात जर आपण आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी ठरलो तर कोणाला आनंद होणार नाही, प्रत्येक आई-वडिलांना असं वाटतं की, आपल्या मुला मुलींनी चांगलं शिक्षण घ्यावं, चांगल्या नोकरीला लागावं, त्यांचं भविष्य हे उज्वल असावं. त्यासाठी आई-वडील सातत्याने कष्ट करत असतात. अश्याच कष्टाचं फळ मैत्री पटेल हिने आपल्या आई-वडिलांना वयाच्या एकूण १९व्या वर्षीच दिल आहे.
कारण गुजरात मधील मैत्री पटेल ही १९ व्या वर्षी पायलट झाली, आपल्या मुलीचं पायलट होण्याचं स्वप्न होतं त्यामुळेच कांतीभाई पटेल आणि आई रेखा पटेल यांनी आपली जमीन विकून मुलीचे स्वप्न पूर्ण केल, एकुलत्या एक मुलीचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या कुटुंबाला मोठा संघर्ष करावा लागला. कुठलीही बँक कर्ज द्यायला तयार नव्हती त्यामुळे शेवटी शेती विकून त्यांना आपल्या मुलीचे शिक्षण पूर्ण करावा लागलं. आतापर्यंत सर्वात कमी वयात पायलट होण्याचा मान मैत्री पटेल हिला मिळाला.
आई-वडिलांचा असलेला सपोर्ट व आशीर्वाद तसेच मैत्री हिच्या अभ्यासाची चिकाटी या जोरावरती तिनं १९व्या वर्षी पायलट होण्याचा मान मिळवला. आता तिच कॅप्टन होण्याचं स्वप्न आहे. त्यासाठीच ती आता प्रयत्न करते आहे.
बालपणी मैत्रीला विचारलं जायचं की, “तुला मोठे होऊन कोण व्हायचं ? तर ती आवर्जून सांगायची की ‘मला पायलट व्हायचं ! आणि वयाच्या १९ व्या वर्षीच पायलट झाली, त्यामुळे आई-वडिलांचा उर आनंदाने भरून आला, गावातही तिचं सर्वत्र कौतुक केले जातात, अगदी कमी वयात पायलट होण्याचा मान मिळाल्यामुळे मैत्री पटेल ही प्रत्येकासाठी आदर्शवत ठरत आहे.