हल्लेखोरावरील कारवाईसाठी नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी मोर्चा व कामबंद आंदोलन केले.
तुळजापूर -(सचिन ठेले ) शारदीय नवराञ उत्सवात अतिक्रमण काढल्याचा राग मनात धरुन स्वछता निरक्षक दत्ता सांळुके यांच्यावर लोखंडी वस्तुने डोक्यावर वार करुन जखमी केल्याची घटना गुरुवार दि १३रोजी सांयकाळी ६.३०वा भवानीरोडवर घडली. या हल्यात स्वछता निरक्षक दत्ता सांळुके हे गंभीर जखमी झाले असुन यामुळे नगरपरिषद कर्मचाऱ्यांन मध्ये दशहतीचे व भितीचे वातावरण पसरले आहे, त्यांना काम करताना त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
या प्रकरणी हल्लेखोरावर कठोर कारवाई करण्याची मागणी नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी करीत शुक्रवार रोजी कामबंद आंदोलन केले. स्वछता निरक्षक दत्ता सांळुके यांच्या वर अतिक्रमण हटाव प्रकरणी हा दुसरा हल्ला आहे. या बाबतीत अधिक माहीतीअशीकि शुक्रवार सांयकाळी स्वछतानिरक्षकदत्तासांळुके हे भवानी रोडवरील दिपक चौकात आले असता अज्ञाताने त्यांचा डोक्यावर लोखंडी वस्तुने हल्ला केला हल्ला होताच त्यांना तात्काळ उपजिल्हारुग्णालयात उपचारार्थ रवाना करण्यात आले असुन गंभीर प्रकृती पाहता तातडीने उस्मानाबाद येथील उपजिल्हारुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे,
तिर्थक्षेञ तुळजापूरात अतिक्रमण मुळे सातत्याने शहराचे शांततेचे वातावरण धोक्यात येत असल्याने यात जिल्हाअधिकारी यांनीच लक्षघालुन कायम स्वरुपी या समस्यावर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. हल्लेखोरावरील कारवाई साठी मोर्चा व कामबंद आदोलन नगर परिषद स्वच्छता निरीक्षक तथा अतिक्रमण विभाग प्रमुख श्री. दत्ता साळुंके यांच्यावर कोयत्याने झालेल्या प्राणघातक हल्ला घटनेचा जाहीर निषेध करून हल्लेखोरावर कठोर कार्यवाही करावी यामागणीसाठी नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी कामबंदआंदोलन करुन उपविभागीयपोलिसअधिकारी कार्यालयावर मोर्चा काढुन पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली.
स्वच्छता निरीक्षक तथा अतिक्रमण विभाग प्रमुख श्री दत्ता साळुंके हे शहरातील स्वच्छता मोहीम राबवीत असताना सदर ठिकाणी शारदीय नवरात्र महोत्सव २०२२ यात्रा कालावधीत अतिक्रमण मोहिमे अंतर्गत अतिक्रमण काढलेचा राग मनात धरून पवन दिलीप सोनवणे या इसमाने कोयत्याने श्री दत्ता साळुंके यांच्यावरप्राणघातक हल्ला केला . यात श्री.दत्ता साळुंके गंभीररीत्या जखमी झाले असून सद्या त्यांच्यावर उस्मानाबाद जिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरु आहेत . सदर प्रकरणी हल्लेखोर माथेफिरू पवन दिलीप सोनवणे यांच्यावर भारतीय दंडसंहिता १८६० वे कलम ३५३,३०७,३३२,३३३,५०४ नुसार तत्काळ गुन्हा नोंद करून हल्लेखोरास तत्काळ अटक व्हावी तसेच श्री . दत्ता साळुंके यांच्या कुटुंबीयांना तत्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे अशा मागणी चे निवेदन नप कर्मचाऱ्यांनी जिल्हाअधिकारी उपविभागीयपोलिसअधिकारी तहसिलदार यांना दिले