महत्वाची बातमी

निलेश लंके समर्थकांना पोलिसांच्या माध्यमातून होतोय त्रास, सरपंचाला पकडण्यासाठी अतिरेक्यांसारखा मोठा फौजफाटा

नगर – नगर दक्षिण मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या समर्थकांना आता पोलिसांच्या माध्यमातून त्रास देण्यास सुरुवात झाली आहे. राजकीय दबावातून हे सर्व घडवून आणले जात आहे. नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील ग्रामपंचायतचे सरपंच शरद पवार यांच्यावर कारवाई साठी तर अतिरेक्यांना पकडण्यासाठी पाठवतात तसा मोठा फौज फाटा पाठवून गावात पोलिसांमार्फत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न मंगळवारी (दि.३०) करण्यात आला.

याबाबत सरपंच शरद पवार यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात त्यांनी म्हंटले आहे की, नगर तालुका पोलिस ठाण्यात दाखल एका गुन्ह्यात आपणास मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे. यात जामिनात गावात प्रवेशास मनाई करण्यात आलेली आहे. मात्र मी गावचा सरपंच असल्याने ग्रामपंचायतच्या सर्व बैठका, पाणीपुरवठा विभागाच्या बैठकांना ग्रामपंचायत कार्यालयात येण्यास मुभा देण्यात आलेली आहे. या आदेशाची प्रत आपण नगर तालुका पोलिस ठाण्यात दिलेली असतानाही मंगळवारी (दि.३०) सकाळी आपण ग्रामपंचायत मध्ये मिटिंगला गेल्यावर नगर तालुका पोलिसांनी मोठा फौजफाटा गावात आणला. स.पो.नि. प्रल्हाद गिते यांनी ग्रामपंचायत कार्यालयात येवून आपणाला बाहेर आणले.

पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्या समोर लगेच गाडीमध्ये बसून पोलीस स्टेशनला यायचं असे धमकावताच ग्रामस्थांनी विचारणा केली असता पोलिसांच्या बोलण्यामध्ये विसंगती दिसून आली, याबाबत सरपंच शरद पवार व कार्यकर्ते यांनी आक्रमक होत सांगितले की, निलेश लंके यांच्या समर्थकांना याप्रकारे खोट्या बोगस कारवाईमध्ये लोकसभा निवडणुकीच्या हेतूने गुंतवण्याचे काम चालू आहे. जर निवडणूक डोळ्यासमोर ठेवून षडयंत्र करत असाल तर आम्ही स्वस्त बसणार नाहीत, व नगर तालुक्यात अनेक ठिकाणचे बेकायदेशीर धंदे, वाढती गुन्हेगारी, चोऱ्या याकडे जाणीवपूर्वक पोलीस दुर्लक्ष करून राजकीय दबावातून आमच्या सारख्यांना खोट्या गुन्ह्यात गुंतवण्याचा प्रयत्न होत आहे.

याबाबत आता आम्ही स्वस्त बसणार नाहीत, पोलिसांची ही दबंगगिरी थांबली नाही तर पोलीस अधीक्षक राकेश ओला, नाशिक परिक्षेत्रचे विशेष पोलिस महानिरीक्षक बाळासाहेब शेखर यांच्याकडे दाद मागणार आहोत, आणि त्या ठिकाणी न्याय मिळाला नाही तर न्यायालयात या पोलिसांविरुद्ध दाद मागणार असल्याचे सरपंच शरद पवार यांनी सांगितले.

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Share this news instead of copying!