आता जेष्ठ नागरिकांसाठी खुशखबर, या वयोगटापुढील जेष्ठांना S. T. चा प्रवास मोफत असणार आहे.
शिंदे आणि फडणवीस या नवीन सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत चांगली योजना आणली. या योजनेचा आता प्रारंभ देखील झाला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कुठे बाहेर जायचं असेल किंवा काही कामानिमित्त कुठे इतरत्र जायचं असेल, तर ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास हा आता सुखकर होणार आहे. कारण एक रुपयाही खर्च न करता आपला प्रवास हा आनंदात होणार आहे.
अशी महत्त्वाची योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होती आणि याच योजनेचा आता ज्येष्ठ नागरिक लाभही घेत आहेत. 23 ऑगस्ट रोजी घोषणेनंतर राज्यात 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांचा मोफत एसटी प्रवासाला सुरुवात झाली. त्यानुसार या निर्णयाची अंमलबजावणी करत एसटी महामंडळाने राज्यातील 75 वर्षावरील जेष्ठांसाठी एसटीचा प्रवास आता विनामूल्य केला. शिंदे फडणवीस सरकारच्या या निर्णयाबद्दल ज्येष्ठ नागरिकांमधून समाधान व्यक्त केला जात आहे.
उतरत्या वयामध्ये हातात पैसे नसतात आणि इथे इतरत्र कुठे जायचं म्हटलं तर घरातील मंडळींना पैसे मागावे लागतात. मात्र सरकारच्या योजनामुळे आता कुणालाही पैसे मागण्याची गरज नसते. आणि आपण स्वतः आपल्या मनासारखं कुठेही फिरू शकतो. मुख्यमंत्री शिंदे यांच्या निर्णयानंतर आता सरकारी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडेही लक्ष केंद्रित करत आहे. त्यांच्याही मागण्या लवकर सोडणार आहे अशा भावना आता एसटी कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केल्या जातात. कारण प्रवाशांसाठी एवढा चांगला निर्णय घेणार सरकार नक्कीच एसटी कर्मचाऱ्यांसाठी देखील तितकाच चांगला निर्णय जाहीर करेल अशी अपेक्षा आता व्यक्त केली जाते.