भाजपा नेत्याच्याच घरात त्या मुलीला नरकयातना, पहा कोण आहे सविस्तर बातमी.
असं म्हटलं जातं दोन स्त्रियांचं कधीच चांगल्या पद्धतीने जमवू शकत नाही बऱ्याचदा स्त्रीच ही स्त्रीची दुश्मन असते. ती एकमेकीला समजूनही घेत नाही आणि तशी वागतही नाही. पण कधी यास दोन स्त्रियांचा जमलं तर मग तर दुसरं कोणाचं जमू देत नाहीत. स्त्रियांबद्दल अशी अनेक वाक्य आहेत दैनंदिन आयुष्यामध्ये बोलली जातात मात्र या स्त्रीने अमानुष्यपणे चा कळस घातलाय.
आपला मोलकरणी सोबत तिने अत्यंत चुकीचे केले, यामधील जी मालकीण आहे ती माजी आईएएस अधिकाऱ्याची पत्नी तर भाजपाच्या नेत्या देखील आहेत. सीमा पात्रा असे या मालकीणीचे नावे आणि त्यांची मोलकरीण सुनीता हिने त्यांच्यावरती गंभीर आरोप लावलेत. सुनीता म्हणते की, सीमा पात्रा यांनी तिच्यावर लोखंडी वस्तूने वार करून तिचे दात तोडले. गरम तव्याने तिच्या शरीराच्या अनेक भागांवर चटके दिले. त्याच्या खुणा शरीरावरती अजूनही आहेत.
तिने सांगितलं की, मॅडमचा मुलगा आयुष्यमान ने तिला या सगळ्यातून वाचवलं आणि त्यामुळेच आज ती जिवंत आहे. एका खोलीत तिला बंद केलं होतं तिला कित्येक दिवस खायलाही दिलं नव्हतं त्यामुळे ती अशक्त झाली. सुनीताने सांगितलं की, तिला व्यवस्थित उभा राहता येत नसताना तिला काम करायला लावलं होतं. पोलिसांनी सुटका केल्यानंतर सुनीतावरती उपचार सुरू करण्यात आले.
उपचार करणारे डॉक्टरांनी सांगितलं रुग्णालयात जेव्हा तिला आणलं तेव्हा ती अत्यंत अशक्त होती. हळूहळू त्याची शारीरिक परिस्थिती सुधारली पीडिता अजूनही पूर्णपणे बरी झालेली नाहीये. ती बरी झाल्यानंतर न्यायालयात जबाब नोंदवला जाईल. तिच्या वक्तव्यानंतर पुढील कारवाई देखील केली जाईल. या प्रकरणाचा पोलिसांकडून अद्याप तपास सुरू आहे. तरी याप्रकरणी विरोधकांनी देखील या वादात उडी मारली.
काँग्रेस आमदार दीपिका सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून ट्विट करत भाजपाला चांगलंच घेऱ्यात घेतल आहे. धिक्कार असो त्या सीमा पात्रा यांचा ज्यांनी ओलीस ठेवलेला महिलेसोबत क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. तिची कहाणी शब्दात वर्णन करता येणार नाही. पावर आणि पैशाच्या गर्वात ज्या मुलीचे दात तोडले, अंगावर गरम तव्याचे चटके दिले, अपमानास्पद वागणूक दिली. आता स्मृती इराणी कुठे आहेत ? भाजपाच्या महिला मोर्चा झोपला का ? एक गरीब आदिवासी मुलगी तुमच्यासाठी मुलगी नाही का ? रस्त्यावर उतरा आणि महिलेसाठी कठोर शिक्षेची मागणी करा. महिला आयोग या विरोधात कारवाई करणार का ? असे संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केले होते.