मयत नागेश पवार याला मारणाऱ्या रेल्वे पोलिसांवरती 302 चा गुन्हा दाखल करा, पहा बातमी सविस्तर.
ॲड.डॉ.अरुण (आबा) जाधव
जामखेड येथील नागेश रामदास पवार (वय २५) यांस पुणे रेल्वे पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक करून अमाणुष मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. जामखेड शहरातील डॉ. आरोळे वस्तीमधील हा तरूण नागेश पवार दोन महिन्यापूर्वी मोलमजुरी करण्यासाठी पुणे येथे गेला होता. याच दरम्यान १५ ऑगस्टला पुणे रेल्वे पोलिसांनी एका चोरीच्या गुन्ह्यात नागेश पवार व सासरे सुरेश काळे या दोघास हडपसर पुणे येथून पहाटे उचलले. सुरेश काळे यांचा पूर्वी अपघात झाल्याने त्याच्या पायात हातामध्ये रॉड टाकलेले होते. नागेशची बहीण राणी पोलिसांना ओरडून सांगत होती. परंतु पोलिसांनी ऐकले नाही व मारहाण करत राहिले आणि २३ ऑगस्टला नागेशला ससून रुग्णालयामध्ये दाखल केले होते. त्याची तब्येत सिरीयस असल्याचा निरोप नागेशची बहीण राणीला मिळाला. राणी ससून रुग्णालयामध्ये गेली असता. राणीने डॉक्टरांना विचारले असता नागेशची मयत झाल्याचे कळले.
रेल्वे पोलिसांनी केलेल्या हत्येच्या विरोधात निदर्शने जामखेड मधील खर्डा चौकात चालू असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड.डॉ. अरुण (आबा) जाधव म्हणाले कि हा माझा आदिवासी समाज इंग्रजांच्या विरोधात लढणारा बांधव आहे.भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी इंग्रजाच्या विरोधात उठाव बंड करून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी गुन्हेगारीचा शिक्का या आदिवासी समाजावर कायम आहे .आदिवासी समाजला जमीन नाही ,घर ,स्वतःची जागा व्यवसाय नाही . वीटभट्टी, ऊसतोड रेल्वे स्टेशनवर फुल विकणे मजुरी करणे व उपजीविका भागवणे पण चोरी करणारे वेगळे आणि मरावे लागते या आदिवासी बांधवांना.सरकार म्हणते हर घर तिरंगा देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्व भारतीयांनी साजरा केला आहे .आणि इकडे एक आदिवासी तरुण कर्ता पारधी समाजातील युवक पोलिसांच्या खोट्या आरोपामध्ये मारहाणीत मृत्यू झाला मयत नागेशला ३ मुले असून जामखेडच्या निवारा बालगृहात शिक्षण घेत आहे. स्वातंत्र्यानंतर ७५ वर्ष होऊनही पारधी समाजाकडे चोर म्हणूनच पाहिले जाते.या कुटुंबाच्या नातेवाईकांना दहा लाख रुपये मिळाले पाहिजे व पुणे येथील रेल्वे पोलिसांवरती गुन्हा दाखल झालंच पाहिजे अशी भूमिका ॲड.डॉ.अरुण (आबा)जाधव यांनी मांडली प्रा.मधुकर(आबा) राळेभात (राष्ट्रवादी नेते) यांनी पाठिंबा दिला ,बापू ओहोळ (लोक अधिकार प्रवक्ते) विशाल पवार, द्वारका पवार, प्रकाश काळे यांनी भूमिका मांडली
यावेळी आतिश पारवे, आजिनाथ शिंदे, राम पवार, लक्ष्मी पवार ,अमित जाधव, शिवहरी काळे, शंकर पवार, तुळशीराम पवार,रोहित पवार, मनीषा काळे, पूजा शिंदे, मच्छिंद्र जाधव,मोहन शिंदे,संतोष पिंपळे, रमेश काळे, चंद्रकांत काळे,भीमा काळे,हर्षद काळे,सचिन काळे, सुनीता चव्हाण,बाबासाहेब फुलमाळी,संतोष शेगर,आयकाश काळे ,शहाणूर काळे, अतुल ढोणे, गणपत कराळे , तसेच आभार अरुण डोळस यांनी मानले.