कोरोनामध्ये पती गमावले, पण आपल्या पतीला दिलेला शब्द पाळत पत्नीने पुढील शिक्षण पूर्ण केले; पहा सविस्तर.
आयुष्य हे फार लहान असतं ते मोठे आनंदाने जगले पाहिजे कधी काय होईल हे सांगता येत नाही. कोरोनाच्या संघर्ष काळात अनेक जण आपल्यातून निघून गेले आणि याच कोरोनाचा फटका एका कुटुंबाला देखील मोठ्या प्रमाणात बसला. ते कुटूंब म्हणजेच ज्योती गवारे- लोखंडे यांचं ,त्यांच्या पतीला नेहमी वाटायचं की, आपल्या पत्नीने बारावी तरी पास व्हावे, आणि त्यासाठी तिला नेहमी प्रोत्साहन करायचे.
ज्योती यांचे पती एका खासगी कंपनीत कामाला होते. दोन मुलांची जबाबदारी स्वीकारत तिने शिवणकाम शिकले. आता शिवणकाम करून उदरनिर्वाह करत आहे. अकरावीत असतानाच तिच्या पतीचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र डोंगराएव्हढे दु:ख पचवत तिने ठरल्याप्रमाणे अभ्यास करत १२ वीची परीक्षा उत्तीर्ण होत ५१.६७ टक्के मिळवले. तिचे हे यश पाहायला आता जगात पती सचिन नाहीत, तरी ती हिंमत हारली नाही, तर त्यांनी स्वत:ला सिद्ध करुन दाखवले. पिंपळे गुरवमध्ये राहणाऱ्या ज्योतीच्या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पतीच्या निधनानंतर कॉलेज शिक्षण पूर्ण करणाऱ्या या आईवर परिसरातील नागरींकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. कुटूंबियांनी त्यांचे लग्न लावून दिल्याने पुढे शिकण्याची इच्छा असूनही शिकता आले नाही. मात्र पतीची इच्छा होती की, तिने बारावी उत्तीर्ण व्हावे, ती इच्छा पूर्ण करण्याचे त्यांनी मनोमन ठरवले कोरोनामुळे आपल्या प्रियजणांना गमावल्यामुळे अनेक कुटुंबे आणि व्यक्ती उध्वस्त झाल्याचे गेल्या २ वर्षात सगळ्यांनीच पाहीले.
पण या परिस्थितीतही ज्योती लोखंडे-गवारे या पत्नीने आपल्या मृत पतीची इच्छा पूर्ण केली आहे. त्यांनी लग्नात दिलेला शब्द ज्योतीने पाळला आहे.. रात्रप्रशालेतून बारावीची परीक्षा देणाऱ्या ज्योती यांना मराठी, अकांउट, मॅनेजमेंट, चिटणीस या विषयात १०० पैकी ६३ गुण मिळाले आहेत. तिच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी पतीसोबत नसला, तरी त्यांनी पतीला दिलेले वचन पूर्ण करत उत्तीर्ण होऊन दाखवले. अवघ्या वर्षभरापूर्वी पतीच्या निधनानंतर ज्योती यांनी हे दु:ख पचवत खचून न जाता अभ्यास केला. पतीच्या आठवणीने मला अभ्यासाची प्रेरणा मिळाली,असे सांगणाऱ्या ज्योती तिच्या लहानग्या दोन मुले, वृद्ध सासू, अपंग नंणद यांचाही सांभाळ करत आहेत.
विशेष म्हणजे इतक्या मोठ्या दु:खानंतर मला माझ्या मुलांसाठी प्रेरणा बनायचे आहे, मी आईसारखा होईन असे उदाहरण त्याच्यासमोर ठेवायचे असल्याचे त्या सांगतात. हे सगळं सांगत असताना कुठेतरी आपल्या पतीची आठवण त्यांना सतत येत राहते. आपल्या पतीने आपल्याला जगण्याचा मार्ग शिकवला, सुशिक्षित होऊन स्वतःच्या पायावरती उभे राहण्यासाठी प्रोत्साहन देत होते. मात्र आज पतीच आपल्यात नाहीयेत म्हणून खचून न जाता आपल्या मुलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलांना आदर्श होण्यासाठी त्या कणखरपणे उभ्यात आहेत.