गुलटेकडी एकता सेवा प्रतिष्ठान च्या वतीने एक पोळी गोर गरिबांच्या मुखी उपक्रम संपन्न

प्रतिनिधी मंगेश गांधी
एक पोळी गोर गरिबांच्या मुखी होळी निमित्त अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या उपक्रमाच्या आयोजन.
गुलटेकडी एकता सेवा प्रतिष्ठानच्यावतीने इंदिरानगर, मीनाताई ठाकरे औद्योगिक वसाहत, महर्षीनगर मुकुंदनगर इ. वस्ती भागात नागरिकांच्या घरोघरी जाऊन सौ स्वातीताई शेरला,कोमल साळुंखे, ज्योती जगताप,सोनाली खंडागळे जया सांळुखे, आदी महिलांनी होळीच्या निमित्ताने “एक पुरण पोळी गोर गरिबाच्या मुखात” असा सामाजिक संदेश देत सातशे ते आठशे पोळ्या संकलन केल्या.
व त्या पुरण पोळ्या स्वारगेट येथील गोर गरीबाच्या मुखात देण्याचा प्रयत्न केला यावेळी गणेश शेरला व सहकार्याच्या हस्ते पोळी वाटप करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन गुलटेकडी एकता सेवा प्रतिष्ठान यांनी केले.
यावेळी ,स्वाती शेरला,दत्ता सोनार ,मारूती कांबळे,अमोल आरकल, रुपेश राजभर ,महेश सांळुखे, नझीर शेख,देवेद्र मांडवे,अक्षय मदने, यांनी सहभाग नोंदवून उपक्रमास परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे आयोजन गणेश शेरला व गुलटेकडी एकता सेवा प्रतिष्ठान यांनी केले.