माझं गाव
सोयगाव महसूल,पोलीस प्रशासन व तहसीलच्या वतीने श्री.गणेश विसर्जन स्थळ पाहनी.
विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगाव ( प्रतिनिधी ) महसूल – पोलीस तसेच सोयगाव नगर पंचायत प्रशासनाने आज संयुक्तपणे श्री. गणेश विसर्जन स्थळ व मिरवणूक मार्गाची पाहनी केली.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रभाकर काळे, तहसिलदार रमेश जसवंत साहेब,नायब तहसिलदार जाधव साहेब,नगरपंचायतचे शिमरे साहेब,शिंदे साहेब,शेख रऊफ,अमोल मापारी, शेख बबलू आदींची उपस्थिती होती.
गणेश विसर्जनासाठी प्रशासन सज्ज असून मिरवणुकीदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी, गणेश भक्तांनी मिरवणुकीत शिस्तबद्ध व कायद्याचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.