चक्क एका पोलिस हवालदार व त्याच्या कुटुंबाने उचलले टोकाचे पाऊल. पहा बातमी सविस्तर.

चक्क एका पोलिसाच्या त्या कुटुंबाने असं का केलं हा प्रश्न प्रत्येक जण उपस्थित करतोय. गुजरातच्या अहमदाबाद मध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. तिघांनी बारावा मजल्यावर उडी मारून जीवन संपवला. मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. पोलीस हवालदार आणि पत्नी आणि मुलीसह आपल्या राहत्या घरातूनच बारावा मजल्यावर उडी मारून जीवन संपवला.
आपली पत्नी रीती आणि तीन वर्षाची आकांक्षी यांनी आपले जीवन संपवले प्रथम पत्नीने बाराव्या मजल्यावर उडी मारली त्यानंतर पोलीस हवालदार कुलदीप आपल्या लेकी सह उडी मारून खाली पडला त्या ठिकाणी वास्तव्यात असणाऱ्या मंडळींनी ही माहिती दिली. रितीने उडी मारल्यानंतर अवघ्या दहा सेकंदात कुलदीप ने आपल्या लेकीचा सोबत उडी मारली तरी यामध्ये फोरेंसिक निकाल अहवालानुसार यात कोणीही कुणाला धक्का दिला नाही अशी देखील माहिती पुढे येते.
तपासातून आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार हे प्रकरण, या तिघांच्या आत्महत्येचे कारण अद्यापही समजू शकले नाहीये. या कुटुंबाने आत्महत्या का केली असावी तर या दांपत्यांमध्ये कौटुंबिक वादातूनही आत्महत्या झाली असावी असे देखील सांगण्यात येतं. आत्महत्या पूर्वी या ठिकाणी काय घडलं यासाठी यांचे मोबाईल तपासले जाणार आहेत. कुलदीपच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना आत्महत्या पूर्वे व्हाट्सअप वरती त्यांनी मेसेज केले ते देखील लक्षात घेतले जातील.
सहकाऱ्यांना ग्रेड पॅच लाभ मिळाले याबद्दल आनंदी असल्याचेही कुलदीप यांन मेसेज मध्ये म्हटलं होतं. पोलीस कर्मचारी आणि त्याच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी नुकतीच भरघोस निधी मंजूर केला होता. त्यामुळे आता पोलीस कर्मचाऱ्यांचे कल्याण होईल अशी चर्चा सर्वत्र होती, मात्र असतानाच गुजरात मधीलच एका कुटुंबाने अशा पद्धतीने आत्महत्या करणे हे अत्यंत धक्कादायक आहे.