मुस्लिम मुलीशी लग्न केलं म्हणून तरुणाला मारहाण व नंतर त्याचे अपहरण केल्याचा संशय, पहा प्रकरण सविस्तर.
हिंदू – मुस्लिम वाद काही ना काही कारणाने पुन्हा समोर येत आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आंतरधर्मीय विवाह चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे वेगवेगळे वळण मिळत आहेत. त्यावरून अनेक वाद उफळत आहेत. अमरावती असेल, आता अहमदनगर मध्ये देखील असाच एक प्रकार घडला. हिंदू – मुस्लिम विवाहाच्या माध्यमातून पुन्हा एकदा हा वाद चहाट्यावरती येत आहे. मुस्लिम मुलीशी लग्न आणि हिंदू तरुणाचा अपहरण तर कुटुंबीयांचा घातपाताचा संशय, हा प्रकार श्रीरामपूर मध्ये घडला आहे.
लव जिहाद च्या प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या श्रीरामपूर मध्ये एक धक्कादायक घटना घडली, एका हिंदू तरुणांन मुस्लिम तरुणीशी लग्न केलं म्हणून त्याच अपहरण केल असल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्याचा घातपात झाला असावा असा देखील संशय कुटुंबीय व्यक्त करतात. याप्रकरणी पोलिसांनी पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतला आहे, मात्र तरुणाचा अद्यापही कुठलाही तपास लागलेला नाही. पोलिस तरुणाचा तपास करत आहेत.
हिंदू मुलींचे धर्मांतर करून त्यांच्यावरती अत्याचार केल्याच्या प्रकरणी विधिमंडळ चांगलंच गाजलं. मुल्ला कटर याला ताब्यात घेऊन चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेशही देण्यात आले. हा मुद्दा आमदार नितेश राणे यांनी हिंदू मुलींचे धर्मांतर करून विवाह करण्यासाठी मुस्लिम तरुणांना पैसे पुरवले जातात असा खळबळ जनक आरोप केला होता.
या दरम्यान आता आणखी एक प्रकरण समोर आले, श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील आदिवासी समाजातील दीपक बर्डे या तरुणाचे मुस्लिम युवती सोबत लग्न केलं. या दोघांमध्ये प्रेम संबंध होते या दोघांच्याही लग्नाला घरच्यांचा विरोध होता. तरी या दोघांनी परस्पर लग्न केलं, याची माहिती मुलीच्या घरच्यांना मिळाल्यानंतर त्यांनी दिपकला मारहाण केली. त्याच्या ताब्यातून त्यांच्या मुलीला ते घेऊन गेले आणि त्यानंतर तिला पुण्याला आपल्या मामाकडे ठेवलं.
याची माहिती मिळाल्यानंतर दीपक दुसऱ्या दिवशी कामानिमित्त पुण्याला गेला, तिथे गेल्यानंतर मुलीच्या मामानं दीपकला मारहाण केली आणि अपहरण केलं असा आरोप त्याच्या मित्रांनी केला त्याचा घातपात झाला असावा असा देखील संशय व्यक्त केला जातो, याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्या अनुषंगाने पोलिसांनी पाच संशयित ताब्यात घेतला आहे. या प्रकरणाला आठ दिवस उलटून गेले आहेत तरीदेखील मुलाचा तपास लागला नाही आणि त्यामुळेच दीपकचे कुटुंब चिंतेत आहे तसेच नातेवाईक संताप व्यक्त करत आहेत.