बनावट डॉक्टरने माणसांना दिली जनावरांची औषधे; नंतर घडले असे काही. नगर ( पाथर्डी ) येथील घटना.
कोरोनाच्या काळामध्ये वैद्यकीय सेवा ही किती महत्त्वाची आहे याचा प्रत्यय प्रत्येकाला आला. वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे डॉक्टर्स असतील नर्सेस असतील त्याचबरोबर मेडिकल विभाग असेल या सर्वांचे उत्तराई आहे. प्रत्येक माणूस राहिला कारण या कठीण काळात 24 तास वैद्यकीय सेवा ही अविरतपणे काम करत होते. मात्र याच वैद्यकीय सेवेला गालबोट लावणारी एक बातमी समोर येते.
ती म्हणजे पाथर्डी तालुक्यातील खंडोबाची वाडी या ठिकाणी एका बोगस डॉक्टरला पकडण्यात आल. तो चक्क माणसांना जनावराची औषधे देत असल्याची माहिती मिळाली होती. एका औषध दुकानदाराच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. राजेंद्र सदाशिव जंजाळ वय वर्ष 47 राहणार बीड असं या डॉक्टरांचे नाव आहे. आरोग्य विभागाने त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.
करंजी जवळच्या खंडोबाची वाडी या ठिकाणी हा प्रकार उघडकीस आला. बहुतांश डोंगराळ भाग असल्याने तिथे मेंढपाळ आणि भटक्या प्रवर्गातील लोक राहतात. या भागात जंजाळ काही दिवसापूर्वी गेला आपण डॉक्टर असल्याचे सांगत लोक त्याच्याकडे उपचार घेऊ लागले. तरुणांना स्वतःकडील औषध, इंजेक्शन देत असे त्यामुळे तो नेमकी कोणती औषधे देतो हे लोकांना कळत नव्हतं. एका तरुणानं डॉक्टरांन दिलेले औषधे संपले म्हणून औषधाच्या दुकानात गेला.
त्या डॉक्टरांना दिलेले औषध दाखवून हे औषध द्या अशी मागणी केली. दुकानदारांन हे औषध कोणासाठी हवा आहे हे तर जनावरासाठीच आहे असं सांगितलं. त्या तरुणांन हे औषध डॉक्टर जंजाळ यांनी माणसांसाठी दिला असल्याचं म्हटलं. हा गंभीर प्रकार लक्षात आल्यानंतर त्या औषध विक्रेत्या दुकानदाराने हा प्रकार करंजी येथील सरकारी आरोग्य केंद्रातील डॉक्टर दिलीप तांदळे यांना सांगितला. आणि त्यानंतर सखोल चौकशी केल्यानंतर तिसगाव आरोग्य केंद्राचे प्रमुख, तालुका आरोग्य अधिकारी यांना देखील माहिती कळवण्यात आली.
आरोग्य पथकाने त्या डॉक्टरांकडे प्रमाणपत्र तपासून पाहिले ती बनावट असल्याचे निदर्शनास आला. त्याच्याकडे औषधांचा साठाही जप्त केला यामध्ये जनावरांसाठी वापरण्यात येणारी औषध मोठ्या प्रमाणात आढळून आले. आणि या डॉक्टरांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्यांना औषध कोणाकोणाला दिली आहे त्याचा काय परिणाम झाला याचा देखील सखोल तपासता सुरू आहे. यासाठी गावकरी देखील आता आरोग्य विभागाला मदत करत येते.