बहुलखेड्यात सोयगाव महिला पोलिसांचा छापा…, पहा बातमी सविस्तर.

विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगाव, दि.०७….गणेशोत्सव विसर्जनाच्या पार्शवभूमीवर सोयगाव पोलिसांनी अवैध दारूविक्री विरोधात तालुक्यात वाश आउट मोहीम हाती घेतल्याने, बुधवारी चक्क स्वतंत्र महिला पोलिसांच्या पथकांनी बहुलखेड्यात अवैध दारूविक्री करणाऱ्या महिलेविरोधात कारवाई केल्यानें तालुक्यात सोयगाव ठाण्याच्या महिला पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे…सोयगावचे पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी स्वतंत्र महिला पोलिसांना अवैध दारूविक्रेत्या महिला विरुद्ध कारवाई साठी पथक स्थापन केले आहे…
बहुलखेडा ता सोयगाव येथे राहत्या घरासमोर संगीताबाई संजय पवार या राहत्या घरासमोर गावरान(हातभट्टी) दहा लिटर दारू विक्रीसाठी बाळगून कबज्यात असल्याची खात्रीलायक माहिती महिला पोलीस भाग्यश्री चव्हाण यांना मिळताच त्यांनी तातडीने बहुलखेडा गावात सापळा रचून विनापरवाना अवैध गावरान(हातभट्टी) ची दहा लिटर दारू विक्री करतांना रंगेहात आढळून आली त्यामुळे तिचे वर कारवाई करून तिच्या ताब्यातून दहा लिटर गावरान दारू अंदाजे किंमत दोन हजार रु हस्तगत करून गुन्हा नोंदवला आहे.
गणेशोत्सव विसर्जनाच्या पार्शवभूमीवर सोयगाव पोलीस अलर्ट झाले असून दुसऱ्या अन्य छाप्यात नांदगाव तांड्यात अवैद्य गावरान दारूची विक्री करतांना बबन शंकर मोरे यास दहा लिटर गावरान (हातभट्टी) ची दारू विक्री साठी बाळगताना आढळून आला त्याचे कडून दहा लीटर गावरान दारू अंदाजे किंमत दोन हजार रु हस्तगत केला आहे.पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार राजू बर्डे,रवी तायडे,गणेश रोकडे,अजय कोळी,प्रियांका बोडखे,कविता कांदे आदीनी ही कारवाई केली आहे.