आषाढी एकादशीनिमित्त शेवगावमध्ये मुस्लीम समाजाने घेतला ” हा ” ऐतिहासिक निर्णय.
पाथर्डी प्रतिनिधी वजीर शेख
आषाढी एकादशी आणि बकरी ईद (ईद-उल-अजहा) एकाच दिवशी येत आहे. त्या पार्श्वभुमीवर एकता, अखंडता आणि एकात्मतेची संस्कृती कायम रहावी. हिंदू-मुस्लीम ऐक्याची पताका सर्वदूर फडकत रहावी म्हणून हिंदू धर्मियांच्या भावनांचा आदर करत शेवगाव मधील मुस्लिम समाजाने आषाढी एकादशीमुळे बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे हिंदू-मुस्लीम एकतेचं नातं आणखी बळकट झालं आहे. मुस्लीम समाजाने घेतलेला हा आदर्श निर्णय खरोखरच कौतुकास्पद आहे.आज शेवगाव शहरात दुपारी झालेल्या बैठकीत मुस्लिम समाजाने हा ऐतिहासिक निर्णय घेतला.
आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी येत आहे. बकरी ईदच्या दिवशी मुस्लीम बांधक बकरीची कुर्बानी देतात तर आषाढी एकादशीला उपवास असतो. दोन्ही पवित्र सणांचा अनोखा संगम त्यादिवशी असला तरी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आव्हान पोलीसांपुढे, दोन्ही समाजापुढे होते.
त्या अनुषंगाने शेवगाव मुस्लिम सामाजाने स्वतः पुढाकार घेत आषाढी एकादशीमुळे बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.