शेतकऱ्याचा नाद खुळा ! MSEB अधिकाऱ्याला इंग्रजीत झापताच आज विभागाने मीटर जोडलं. Video Viral..
साधा सुदा बळीराजा तुम्ही नेहमी पाहत असाल मात्र फडफडा इंग्लिश बोलणारा शेतकरी तुम्ही पाहिला नसेल वीज कनेक्शन तोडण्यासाठी आलेल्या वीज महामंडळाच्या अधिकाऱ्याशी शेतकऱ्याने चक्क इंग्रजीतून संवाद साधला असल्याची घटना घडली होती. सांगली तालुक्यातील आटपाडी येथील ही घटना असून या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.
वेताळ चव्हाण असं या शेतकऱ्याचं नाव असून या घटनेनंतर महावितरण विभागाला जाग आली असून विभागाने एकाच दिवसात शेतकऱ्याचे मीटर जोडून दिलं आहे.दरम्यान, महावितरण विभागाने शेतीसाठी असलेल्या लाईटची चोरी रोखण्यासाठी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. तर अभियंता सुनील पवार हे आटपाडी तालुक्यातील य.पा.वाडी येथे तपासणीसाठी आले असता शेतकरी वेताळ चव्हाण यांनी त्यांच्याशी इंग्रजीतून संवाद साधला होता.
हा व्हिडिओ महावितरण अधिकाऱ्याने शूट केला आहे. महावितरणने मीटर कनेक्शन तोडल्याची तक्रार शेतकऱ्याने सदर अधिकाऱ्याकडे केली होती. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तर या शेतकऱ्याने MA इंग्रजीचं शिक्षण घेतलं असल्याची माहिती आहे.या व्हिडिओमध्ये शेतकरी आपली बाजू चांगल्या पद्धतीने अधिकाऱ्यासमोर मांडताना दिसत आहेत. “मी अनेकवेळा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागणी केली पण साहेब माझे ऐकून घेत नाहीत” असं शेतकरी इंग्रजीतून बोलत आहे.
वीज जोडून दिल्यावर काय म्हणाले शेतकरी आजोबामीटर जोडून देत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले आहे. काल मी माझी अडचण सदर अधिकाऱ्याला सांगितली होती. त्यानंतर त्यांनी आज माझी अडचण सोडली आहे असं म्हणत वेताळ चव्हाण यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले आहे.