म्हणून त्या कोंबड्याला लिलावात मिळाला 34 हजाराचा भाव, पहा बातमी सविस्तर.

एक कोंबडा सध्या मार्केटमध्ये तुफान व्हायरल होतोय, कारण या कोंबड्याला लिलावात भाव चक्क 34 हजार रुपये मिळाला आहे, रुबाबदार कोंबडा अनेकांना भावत आहे, त्यामुळेच या कोंबड्याला चांगला भाव मिळाला.आजपर्यंत तुम्ही महागाई अनेक पाहिली असेल भावात अनेक चढ-उतार पाहिले असतील मात्र ही बातमी एका कोंबड्या बद्दलची आहे या कोंबड्यानं जो भाव खाल्लाय तो भाव ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेतपेरुंबरम येथील एका स्थानिक मंदिरांसाठी झालेल्या लिलावात ( auction ) एका कोंबड्याने चांगलाच भाव खाल्ला आहे.
या तुर्रेदार कोंबड्याला ( rooster ) या उत्सवातील लिलावात तब्बल 34,000 रूपयांचा भाव मिळाला आहे. या कोंबड्याला पाहण्यासाठी खूप गर्दी होत आहे. मंदिराच्या उत्सव कमिटीने या लीलावाचे आयोजन केले होते. इरट्टी जवळील पेरूंबरम येथे हा लिलाव झाल्याचे म्हटले जात आहे. एका स्थानिक मंदिराच्या कामासाठी या लिलावाचे आयोजन ग्रामस्थांनी केले होते.इरट्टी जवळील पेरुंबरम येथील नवीन भगवती मंदिराच्या उत्सव समितीने मंदीराच्या कामासाठी एका लिलावाचे आयोजन केले होते. यात कोंबड्याचा लिलाव करण्यात आला,
या कोंबड्याच्या लिलावाची सुरूवात अवघ्या दहा रूपयाने झाली. त्यानंतर बोलीची रक्कम वाढतच गेली. लिलावात या कोंबड्याने आधी हजार रूपयांपर्यंत झेप घेतली. काही वेळात कोंबड्याने दहा हजाराची बोली गाठली. तरीही लिलावासाठी बोली येतच राहिली.या कोंबड्याने दहा हजार रूपयांची भाव गाठल्यानंतर चुरस वाढतच गेली. अखेर पाहता पाहता.. तो वीस हजार रुपयांवर पोहोचला. 20,000 पार केल्यानंतर, आयोजकांनी त्यानंतरच्या प्रत्येक बोलीसाठी 1,000 रुपये निश्चित केले. तरीही, बोली दारांनी हार न मानता स्पर्धेत ते कायम राहिले. त्यानंतर बोली वाढतच गेल्या आणि आणि या अखेर तब्बल चार किलो वजनदार आणि रूबाबदार कोंबड्याला 34,000 रूपयांच्या बोलीवर एका ग्रामस्थाने विकत घेतले.
उत्सव समितीचे अधिकारी पी.असोकन, व्ही.के. सुनेश, व्ही.पी. महेश, के. सरथ, एम. शिनोज, एम. प्रमोद यांच्या नेतृत्वाखाली दोन तासांचा लिलाव पार पडला. उत्सव घोष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांमध्ये जास्त किमतीचे लिलाव झाले असले तरी 34,000 रुपयांचा लिलाव जिंकण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.