संतापजनक : 2 मुलींना फक्त ” एवढा ” रुपयांना विकले आणि त्यांना ……., पहा बातमी सविस्तर.
कातकरी समाजातील गौरी आगीवले हीच ज्या ठिकाणी तिला आई-वडिलांनी विकलं होतं त्या ठिकाणी तिचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर कातकरी समाजाची जी मुलं आहे ते अगदी काही हजार रुपयांसाठी विकली जात आहेत. मेंढपाळ त्यांना घेऊन जातात हे प्रकरण महाराष्ट्रभर गाजलं त्या ठिकाणी मुलांकडून अनेक काम करून घेतली जातात, मुलांना राबवले जातात, त्यांचा छळ केला जातो. आदिवासी जो समाज आहे तो अशिक्षित आहे त्याच्याकडे काय खायचं आणि काय कमवायचं हा प्रश्न उपस्थित राहिला जातो.
म्हणून आपली मुलं कुठेतरी चार घास खातील म्हणून ते वेठबिगारी करायला पाठवतात, मात्र त्या ठिकाणी त्या मुलांचा छळ होतो आणि जो मोबदला दिला जातो मुलांच्या बाबतीत तो देखील अत्यल्प असतो. कुटुंबाचे असलेली आर्थिक परिस्थिती आणि अडाणीपणा याचा फायदा घेऊन जव्हारमधील धारणहट्टी येथील दोन अल्पवयीन मुलींची पाचशे रुपयांमध्ये विक्री केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा नरेश भोये आणि काळू नरेश भोये अशी या अल्पवयीन मुलींची नाव आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील एका मेंढपाळाकडे मनीषा 3 वर्षांपासून तर काळू एक वर्षापासून बालमजुरी करत होती. मागील काही वर्षांपासून या दोन्ही चिमुकल्या या मेंढपाळाकडे मेंढ्यांची साफसफाई, घरगुती काम, मेंढ्यांसोबत गुराखी जाण अशा विविध कामांवर राबवल्या जात होत्या. या बदल्यात त्यांना वर्षाकाठी 12 हजार रुपये आणि एक मेंढी देण्याचं आश्वासन मेंढपाळाकडून देण्यात आलं होतं मात्र प्रत्यक्षात वर्षाला अवघे पाचशे रुपये दिले जात असल्याची माहिती समोर आली आहे.
त्यानंतर या प्रकरणाची श्रमजीवी संघटनेने पुढाकार घेतला. अखेर मुलींना खरेदी केलेल्या मेंढपाळा विरोधात जव्हार पोलीस ठाण्यात कलम 3(1) अंगर्गत गुन्हा दाखल झाला असून आठ वर्षीय मनीषाचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलंय. तर सहा वर्षीय काळु भोये हिचा जव्हार पोलिसांकडून शोध सुरू आहे. या प्रकरणात तपासानंतर पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती जव्हार पोलिसांकडून देण्यात आली आहे.
जव्हार मोखाडा विक्रमगड या परिसरातील अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या निरक्षरतेचा आणि येथे असलेल्या बेरोजगारीच्या समस्येचा फायदा घेत येथील चिमुकल्या मुलांची खरेदी करून त्यांना वेठबिगारी म्हणून राबवला जात असल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेकडून करण्यात आला आहे.