दहावीच्या परीक्षेत होता काठावर पास; बनला IAS अधिकारी.
सध्याचा हा काळ परीक्षांचा आहे, सध्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे मुलं आणि पालक या दोघांच्याही मनावरती मोठा तणाव आहे. आमच्या पाल्याला कमी त्याने मार्क पडले तर विद्यार्थी नापास झाला तर अशा अनेक प्रश्नांनी या ठिकाणी सगळेजण चिंतेत असतात मात्र ही बातमी त्यांच्यासाठीच अत्यंत महत्त्वाची आहे, जे परीक्षेत पास होणे किंवा नापास होणं यावर त्यावेळी आपण आयुष्यात यशस्वी होतो की नाही हे सगळं काही अवलंबून असतं असा विचार करण्यासाठी आहे. दहावीच्या परीक्षेत काठावर पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची ही यशोगाथा आहे.
आयएएस अधिकारी तुषार सुमेरा यांचा दहावीचा निकाल पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसतो, पण यातून अनेकांना प्रेरणा मिळते, दहावीतील तुमच्या कामगिरीचे आधारे तुमचे भविष्य ठरलं जातं असं बऱ्याचदा सांगितलं जातं मात्र IAS तुषार यांना दहावी मध्ये अत्यंत कमी मार्क मिळाले होते, इंग्रजीमध्ये शंभर पैकी 35 मार्क तर गणितात 36 विज्ञानात 38 मार्क होते, हे मार्क वाचून आणि ऐकून अनेकांना धक्का बसला, अगदी एक दोन मार्कांसाठी अनेक मुलं हे नाराज होतात निराश होतात कधी कधी टोकाचे पाऊल उचलतात त्यांच्यासाठी ही बातमी फार महत्त्वाची आहे.
तुषार यांनी मार्कच दडपण अजिबात घेतलं नव्हतं, त्यांनी 2012 मध्ये यूपीएससी उत्तीर्ण केली आणि ते IAS बनले,
दहावीचे गुण पाहून अनेक जण नाराज झाले होते आयुष्यात हा काहीही करू शकणार नाही असे देखील बऱ्याच लोकांनी म्हटल होत, शाळा आणि गावकऱ्यांना देखील त्यांच्याकडून कोणतीही आशा नव्हती असं तुषार सांगतात. दहावी बारावीच्या परीक्षा पास झाल्यानंतर तुषार यांनी ग्रॅज्युएशन मध्ये बीए केलं त्यानंतर बीएड केलं आणि सहाय्यक शिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली.
मुलांना शिकवत असताना यूपीएससीची तयारी देखील त्यांनी सुरू ठेवली, नोकरी करताना ध्येय ठरवून तुषार यांनी तयारी सुरूच ठेवली होती .त्यानंतर 2012 मध्ये परीक्षेत उत्तीर्ण झाले आणि IAS बनले. त्यांचा प्रवास मुलांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे, ज्यांना आपण परीक्षेत नापास होऊ आपल्याला कमी मार्क मिळतील कमी मार्क मिळाले तर आपल्या भविष्यात काहीच होऊ शकत नाही या गोष्टी ज्याच्या मनात येतात त्यांनी एकदा IAS तुषार सुमेरा यांना डोळ्यासमोर आणायचं आणि त्यांच्या जीवनप्रवासातून बोध घ्यायचा, एक परीक्षा तुमचा भविष्य ठरू शकत नाही तर तुम्ही त्या परीक्षेत अगदी कमी मार्गात उत्तीर्ण होऊन सुध्धा उज्वल भविष्य करू शकता .