पाथरी गावातील हृदयद्रावक घटना; 9 वर्षाच्या मुलासोबत पहा हे काय घडले.
अत्यंत दुःखद बातमी समोर येते, आपल्या अवतीभवती अनेक खड्डे असतात, त्या खड्ड्यांमध्ये पाणी असतं त्यामुळे मोठ्या दुर्घटना देखील घडू शकतात अशाच देवळी तालुक्यातील पाथरी गावात एक घटना उघडकीस आली आहे. अंगणवाडीच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पाणी भरून असल्याने त्या खड्ड्यात पडून नऊ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला.
मृतक सार्थक घोडाम हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तिसऱ्या वर्गाचे शिक्षण घेत होता. 11 तारखेला सात वाजता तो घरी न परतल्याने कुटुंबीयांचा त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. मात्र तो कुठेही मिळून आला नाही, तेवढ्यातच कुटुंबीयांनी गावातील जिल्हा परिषद शाळेचे नवीन इमारत बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्याजवळ सार्थक चा जोडा आढळून आला.
अखेर त्याचा मृत्यू आढळून आल्याने खळबळ माजली. मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे अंगणवाडीसाठी खोदलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी भरले, त्यातच उघडया पाण्यात पडून मृत्यू झाला. कंत्राटदारास अटक करा अशी मागणी जोर धरू लागली आहे. यांनी कंत्राटदार आकाश राऊत यांच्याविरुद्ध 304 कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र यात एका निष्पाप चिमुकल्याचा जीव गेला.