कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस घेण्यास लोकांनी फिरवली पाठ, महाराष्ट्रात फक्त ” एवढेच ” लसीकरण.
कोरोनाचा शेवटचा डोस म्हणजे बुस्टर डोस आणि तोच घेण्यासाठी लोकांचा उत्साह कमी झालेला पाहायला मिळत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस घेण्यास मुंबईसह महाराष्ट्राचे नागरिक उदासीन दिसत आहे. मुंबईत अवघ्या 15 टक्के नागरिकांनी कोरोनाचा प्रतिबंधक डोस घेतला त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातील फक्त 18 टक्के नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील नागरिक आपल्या आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा दाखवत असल्याची खंत डॉक्टर व्यक्त करत आहेत.
कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस घेण्यास मुंबईसह महाराष्ट्राचे नागरिक अनउत्साही दिसत आहे. मुंबईत अवघ्या 15 टक्के नागरिकांनी कोरोनाचा प्रतिबंधक डोस घेतला. महाराष्ट्रातील 18 टक्के नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे.
सरकारने 15 जुलै ते 30 सप्टेंबर दरम्यान बूस्टर डोसचा अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या काळात मुंबईतील एकूण 14 लाख 30 हजार नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस घेतला आहे. मुंबईतील 92.30 लाख नागरिक हे प्रौढ नागरिक असून त्यांनी हा डोस घेणे सर्वाना अपेक्षित होते, पण मुंबईमधील फक्त 15 टक्के नागरिकांनी बूस्टर डोस घेतल्याचे समोर आले आहे.
फक्त राजधानीच नाही तर राज्यातील नागरिकांबाबत तेच चित्र पाहायला मिळत आहे. राज्यातील प्रौढ नागरिकांची संख्या 5 कोटींच्या घरात आहे. परंतु राज्यातील केवळ 65 लाख नागरिकांनी या काळात बूस्टर डोस घेतला आहे. आतापर्यंत राज्यातील 81 लाख नागरिकांनी बूस्टर डोस घेतला असून केवळ 18 टक्के नागरिकांनी ही लस टोचून घेतल्याचे समोर आले आहे. केंद्र सरकारने मोफत बूस्टर डोससाठी अमृत महोत्सवाचे आयोजन केले होते, त्यानंतर संपूर्ण देशभरात मोफत बूस्टर डोसचे अभियान राबवण्यात आले होते. परंतु दोन डोस घेतल्यानंतर नागरिकांनी तिसरा डोस घेण्यास पाठ दाखवली आहे.
ज्यांनी वयाची 18 वर्षे पूर्ण केली आहेत आणि त्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले आहेत ते बूस्टर डोस साठी पात्र आहेत. वृद्ध नागरिक आणि ज्यांना गंभीर आजार आहे त्यांनीच बूस्टर डोस घ्यावा असा सल्ला जगातील काही तज्ञांनी दिला आहे. असे असेल तरी राज्यातील केवळ 30 टक्के ज्येष्ठ नागरिकांनी हा बूस्टर डोस घेतला आहे. राज्यात बूस्टर डोस वाढवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. अमृत महोत्सवापूर्वी कोरोना प्रतिबंधक लस केवळ खासगी केंद्रावर उपलब्ध होती, तसेच या लसी मोठ्या शहरांत उपलब्ध असल्याने प्रतिबंधक लस घेण्याचे प्रमाण कमी असल्याचे सांगितेल जात आहे.
कोरोना सारखा साठीचा रोग अद्याप संपलेला नाही, काही भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी दररोज कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत आणि कोरोनामुळे रुग्णांचा मृत्यू होत आहे. राज्य किंवा केंद्र सकारनेही कोरोना संकट संपल्याचे जाहीर केले नाही. कोरोना प्रतिबंधक लसीमुळे कोरोनाची लागण होत नाही असे नाही, परंतु ही लस घेतल्यामुळे कोरोनाचा धोका कमी होतो, यासाठी कोरोना प्रतिबंधक लस घेणे गरजेचे आहे असे पालिकेकडून सांगितले जात आहे.