विद्यार्थीनींची छेड काढली म्हणून प्राध्यापकास मारहाण; नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार पहा सविस्तर बातमी.
दिवसेंदिवस अहमदनगर शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यामध्ये अल्पवयीन मुली, महिला यांच्यासोबत होणाऱ्या अत्याचार, विनयभंग यांचेही प्रमाण जास्त आहे. अशीच एक खळबळजनक अशी घटना नगर जिल्ह्यात शेवगाव येथे समोर आली आहे. एका महाविद्यालयातील प्राध्यापकाने विद्यार्थिनीची छेड काढली म्हणून संतप्त विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी आणि शहरातील काही तरुणांनी शेवगाव येथे संबंधित कॉलेजमध्ये दाखल होत प्राध्यापकाची जोरदार धुलाई केलेली आहे.
यामध्ये पोलिसांनी संशयित प्राध्यापक व या तरुणांना पोलिस ठाण्यात आणले होते, मात्र त्यानंतर त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले. उपलब्ध माहितीनुसार, चार दिवसांपूर्वी हा प्रकार घडला असून प्राध्यापकाने या अगोदर देखील अनेक विद्यार्थिनीची छेड काढली आहे असाही आरोप या प्राध्यापकांवर करण्यात येत आहे. आपली बदनामी होईल या भीतीने अनेक विद्यार्थीनींनी तक्रारही दिलेली नाही.
हे किरकोळ कारण आहे असे सांगत महाविद्यालयाने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे असे देखील नातेवाईकांचे म्हणणे आहे. एका तरुणीने छेड काढण्याचा प्रकार घरी सांगितला आणि त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी महाविद्यालयात येऊन या प्राध्यापकाला जाब विचारला. नातेवाइकांच्या प्रश्नांना उत्तर देताना या प्राध्यापकांची चांगलीच भंबेरी उडाली आणि त्यानंतर त्याने तरुणीच्या नातेवाईकांना देखील दमदाटी सुरू केली.
त्याने दमदाटी करण्याचा प्रयत्न करताच त्यावेळी तिथे असलेल्या संतप्त नातेवाईक आणि गावातील काही तरुणांनी या प्राध्यापकाची जोरदार धुलाई केली. मात्र त्यानंतर कोणीही फिर्याद दिली नाही म्हणून संबंधित प्राध्यापक आणि तरुणीचे नातेवाईक यांना तोंडी समज देऊन त्यांची सुटका करण्यात आली. पण ज्या ठिकाणी आपण शिक्षणाचे धडे देतो, आपण एक शिक्षक म्हणून काम पाहतो तेव्हा या पदाचा मान ठेवायचा असतो. आपल्या आयुष्यात जडणघडणी चा गुरु हा शिक्षक असतो आणि जर त्याच्याकडून असे काही घडत असेल तर हि अतिशय निर्लज्जपणाची बाब आहे.