सकाळी नेहमीप्रमाणे कॉलेजला जात असताना 17 वर्षाच्या तन्वीसोबत नियतीचा खेळ, क्षणात होत्याच नव्हत झालं.
सध्या सर्वत्र पाऊस पडत आहे, त्यामुळे नदी, नाल्याना मोठ्या प्रमाणात पुर आलेला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहून जाण्याच्या अनेक घटना घडत असतात. नाशिकच्या निफाड येथून एक धक्कादायक बातमी समोर आली, विजय गायकवाड हे के के वाघ विद्यालयांमध्ये ग्रंथपाल म्हणून काम करत आहेत, वडिलांच्या शाळेत महाविद्यालय शिक्षण पूर्ण करण्यासाठी तन्वी गायकवाड हिने अकरावी सायन्स मध्ये प्रवेश घेतला होता.
क्लासेस आणि नियमित कॉलेजच्या जाता यावं म्हणून तिने आपल्या मामाच्या घरी राहणं पसंत केल, नियमित कॉलेजला येता यावं म्हणून वडिलांनी तिला इलेक्ट्रॉनिक बाईक घेऊन दिली होती, घरी आई-वडील ,लहान भाऊ ,आजी आजोबा, चुलते असा परिवार होता. परंतु त्या तन्वीच्या आयुष्यात नियतीने वेगळेच काहीतरी लिहिलं होतं, सर्वांची लाडकी असणारी तन्वी नेहमीप्रमाणे सकाळी कॉलेजला जात असतानाच उगाव खेडे येथील नदीवरील पुलावर आली,
आणि अचानक तोल जाऊन गाडीसहित वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली. ती सकाळी सातच्या सुमारास नेहमीप्रमाणे स्कुटी वरून आपल्या कॉलेज कडे जात होती मात्र तिच्यासोबत ही दुर्दैवी घटना घडली. त्यानंतर स्थानिकानी तिला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी मोठा प्रयत्न केला, परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ती पाण्यात वाहून गेले, मात्र तिचा शोध सुरूच ठेवला. ती शिवडी नदीच्या पूलावर आढळली दरम्यान पुढील उपचारासाठी तिला रुग्णालयामध्ये उपचार करण्यासाठी रुग्णालयामध्ये दाखल केला मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केल.
तिच्या शिक्षणासाठी धडपडणारे हे कुटुंब हवालदिल झाल आहे, तन्वीच्या जाण्याने गायकवाड परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.