अभिमानास्पद : अहमदनगरच्या कल्याणीने पहिल्याच प्रयत्नात केली UPSC क्रॅक ! पहा बातमी सविस्तर.

मनामध्ये जर ठरवलं, मनात जिद्द असेल आणि आपल्या आई वडिलांनी घेतलेल्या कष्टाची जर जाण असेल तर आपण ठरवलेल्या कुठल्याही स्वप्नाचे मार्गक्रमण करणे आपल्यासाठी अशक्य नसते.
कोणीतरी सांगून गेले आहे,” केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे.” असंच काहीसं अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर मधील कल्याणी ने सार्थ करून दाखवला आहे. एमपीएससी परीक्षेतून प्रशासकीय अधिकारी बनण्याचे तिचे स्वप्न पूर्ण झाला आहे. कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर धुणी भांडी करणाऱ्या आईची लेख आता मॅडम बनल्या आहेत.
सिव्हिल इंजिनिअरिंग चे शिक्षण घेत असताना महाविद्यालय येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या शासकीय गाड्या बघून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा आपणही देऊ शकतो असं कल्याणीला वाटत असे. आणि त्यातूनच मनाशी ठरवून तिने प्रशासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहिलं. तिने एमपीएससीच्या अभ्यासाची तयारी चालू केली आणि पहिल्याच प्रयत्नात तिने हे यश मिळवले.
कल्याणी हि थेट सहाय्यक अभियंता क्लास १ ( Class १ ) या पदावर जाऊन पोहचली आहे. संगमनेर शहरामध्ये अत्यंत गोरगरीब लोकांच्या परिसर असणाऱ्या संजय गांधीनगर परिसरात संगीता अहिरे या दोन मुलांसह एका छोट्याशा घरात राहतात. कल्याणी व नवनाथ ही दोन्ही मुले लहानपणापासूनच हुशार आहेत. मात्र आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने आई संगीता यांना दुसऱ्याच्या घरी धुणी भांडी करायला जावं लागायचं.
मात्र आईने कष्ट करून दोन्ही मुलांना शिक्षणाचे धडे दिले. दररोज आपल्या आईची होणारी हाल पाहून कल्याणी जिद्दीने पेटून उठली. बारावी झाल्यानंतर तिने अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग चे शिक्षण पूर्ण केले. सिव्हिल इंजिनिअरिंग चे शिक्षण घेत असताना त्यांच्या महाविद्यालयात अनेक प्रशासनातील अधिकारी यांच्या शासकीय गाड्या येत होत्या. त्यावेळेस त्या गाड्या पाहून आपण देखील असेच शासकीय अधिकारी बनू शकतो अशा गाडीमध्ये येऊ शकतो असे तिने मनाशी गाठ बांधली.
आणि त्यासाठी म्हणून तिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी देखील चालू केली घरी अठराविश्व दारिद्र्य होते आई दुसऱ्याच्या घरी जाऊन धुणे भांडी करायची. मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरात राहणं शिक्षण घेणं हे तिला परवडणारं नव्हतं. त्यामुळे कल्याणी ने घरीच राहून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली. आणि पहिल्या प्रयत्नामध्ये नावलौकिक कामगिरी केली. सहाय्यक अभियंता पदासाठी परीक्षा देऊन ती उत्तीर्ण झाली.
जेव्हा या परीक्षेचा निकाल कानी पडला तिच्या आईला आनंदाचा पारा उरला नाही, तर भावाचा आनंद गगनात मावेना. आपल्या लेकीने ठरवलं ते पूर्ण करून दाखवलं. आज केलेल्या कष्टाचं चीज झालं अशी भावना यावेळी आईने बोलून दाखवली.