अभिमानास्पद : पतीच्या सहाय्याने तिने मिळवले यश, ४ वेळा नापास पण ५ व्यांदा बनली IAS अधिकारी.
असं म्हणतात मुलीचं लग्न झालं कि संपूर्ण आयुष्य बदलून जातात, काही मुलींचं लग्नानंतर खरंच आयुष्य बदलून जात. जोडीदार चांगला मिळाला तर ते आयुष्य स्वर्गासारखं सुंदर होतं. आपल्या जोडीदाराची आपल्या स्वप्नात आपल्या कामात मदत असेल तर खऱ्या अर्थाने एखादी स्त्री आपल्या क्षेत्रामध्ये मोठी भरारी घेऊ शकते. लग्न झाल्यानंतर सासरच्या मंडळींनी तिला समजून घेणे, तिला सहकार्य करणं हे फार महत्त्वाचं असतं.
ही बातमी आहे ओडिसा येथे जन्मलेल्या संगीता मोहोपात्रा यांची, त्यांचं लग्न झालं आणि त्यानंतर आपल्या पतीच्या साथीने त्यांनी उंच भरारी घेतली .सुरुवातीच्या काळात अपयश ही आलं मात्र अपयशाने खचून न जाता संगीता यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले. अपयश ही यशाची पहिली पायरी असते ही म्हण संगीता यांनी खरी केली. या यूपीएससीमध्ये चार वेळा फेल झाल्या मात्र माघार घेतली नाही. पाचव्या प्रयत्नात त्या यशस्वी झाल्या . त्यांनी सुरुवातीचे शिक्षण ओडिसा या ठिकाणीच घेतलं. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आयआयटीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आयआयटीमध्ये ऍडमिशन घेऊन मॅकेनल इंजिनिअरिंग ही पदवी त्यांनी पूर्ण केली.
आयएएस अधिकारी होण्यास त्यांचा अगदी सुरुवातीपासूनच ध्येय होतं या मार्गात अनेक अडथळे आले पण त्यांनी त्यांचा अभ्यास सुरूच ठेवला. त्या आपल्या कामात आणि आपल्या अभ्यासात स्वतःला पूर्ण झोपून काम करत. त्यानंतर त्यांचं लग्न झालं, लग्ननंतर देखील त्यांनी आपली तयारी चालूच ठेवली, या तयारीमध्ये त्यांच्या कुटुंबातील मंडळींनी देखील त्यांना सहकार्य केलं. असं म्हणतात की लग्न झाल्यानंतर अनेक जबाबदाऱ्या येतात, अनेक गोष्टी असतात या सर्व गोष्टी सांभाळून संगीता यांनी आपलं स्वप्न पूर्ण केलं शेवटी त्या प्रयत्नाने संगीता या पाचवा प्रयत्न प्रयत्नात दहावा क्रमांक पटकावला त्यामुळे संगीता यांच्या माहेरचे आणि सासरची दोन्ही कुटुंब खूप आनंदी झाले.
अभ्यास करून इंटरनेटच्या चांगली मदत घेऊन त्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली हा प्रवास अत्यंत संघर्षमय होता .मात्र अनेक अडथळ्यांना पार करून त्यांनी हे यश संपादन केले. आज शेकडो विवाहित मुलींच्या त्या प्रेरणा ठरत आहेत. लग्नानंतर आयुष्य बदलत असं काही नाही तर लग्नानंतरही आपण ठरवलेली आपली ध्येय धोरण, आपली स्वप्न आपण पूर्ण करू शकतो याचंच उत्तम उदाहरण संगीता मोहपात्रा होय.