डायलेसिस महिलेसाठी धावून गेली पुणे शहर युवा सेना.

पुणे प्रतिनिधी मंगेश गांधी
शहरी गरीब योजनेअंतर्गत डायलिसिस प्रक्रिया गेले तीन महिने महानगरपालिकेचे टेंडर प्रक्रिया पूर्ण न झाल्याने ठप्प झाली होती. महापालिकेकडून डायलिसिस साठी मिळणारा निधी इस्पितळांना मिळणे बंद झाल्यामुळे डायलिसिस करण्यासाठी पैसे शिल्लक नव्हते. त्या महिला श्रीमती माधुरी विसरे यांच्या मदतीला पुणे शहर युवासेना धावून गेली आहे.
युवासेना पुणे शहर समन्वयक युवराज रामभाऊ पारीख आणि शिवसेना नाना पेठ मुख्य शाखेच्या वतीने त्यांना मदत म्हणून १ महिन्याचे डायलिसिस चे सर्व सामान आणि १ महिन्याची संपूर्ण औषधे देण्यात आले…
याप्रसंगी शिवसेना पुणे शहर संघटक राजेंद्र शिळीमकर युवासेना चे शहराध्यक्ष राम थरकुडे, सनी गवते, परेश खांडके, गौरव पापळ, दक्षेश कुरपे, ऋषभ नानावटी, हर्षद बिबवे,अक्षय बद्रे,रोहित शिवशरण, विशाल बोझे, निलेश जगताप, शुभम दूगाणे, रमेश क्षीरसागर,अभिजित ताटे ,अक्षय मदने , प्रवीण रासकर, उपस्थित त्यावेळी रांका हॉस्पिटल चे व्यवस्थापक श्री रमेश रांका यांनीही सदर महिलेस सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आणि युवासेनेचे सुद्धा ह्या चांगल्या कार्याबद्दल युवासेनेचे आभार मानले…